Sugarcane Sludge: मराठवाड्यात साखरेचे उत्पादन 1 कोटीवर, तरीही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर, काय आहेत कारणे?

Sugarcane Sludge: मराठवाड्यात साखरेचे उत्पादन 1 कोटीवर, तरीही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न ऐरणीवर, काय आहेत कारणे?
ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम आहे.

यंदाचा ऊस गाळप हंगाम महिनाभराने उशिरा सुरु झाला तरी मात्र, मराठवाड्यात साखरेचे उत्पादन हे 1 कोटींहूनही अधिक झाले आहे तर हे उत्पादन 54 कारखान्यांचे मिळून आहे. यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सुरु राहिलेले आहेत. एकीकडे उत्पादनात वाढ आहे, गाळपही मोठ्या प्रमाणात झाले असले तरी अतिरीक्त ऊसाचे करायचे काय हा सवाल कायम आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Jan 17, 2022 | 7:10 AM

औरंगाबाद : (Marathwada) मराठवाड्यात ऊस लागवडीच्या क्षेत्राबरोबर साखरेचे उत्पादनही वाढत आहे. यापूर्वी साखरेच्या उत्पन्नात पश्चिम महाराष्ट्रच केंद्रस्थानी राहिलेले आहे. मात्र, काळाच्या ओघात आता या भागातील पीक पध्दतीमध्ये बदल होत आहे. शिवाय सिंचनामध्येही शेतकऱ्यांनी आत्याधुनिक पध्दतीचा अवलंब केला असून उत्पादनात वाढ होत आहे. यंदाचा ऊस गाळप हंगाम महिनाभराने उशिरा सुरु झाला तरी मात्र, मराठवाड्यात (Sugar production) साखरेचे उत्पादन हे 1 कोटींहूनही अधिक झाले आहे तर हे उत्पादन 54 कारखान्यांचे मिळून आहे. यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सुरु राहिलेले आहेत. एकीकडे उत्पादनात वाढ आहे, (sugarcane sludge) गाळपही मोठ्या प्रमाणात झाले असले तरी अतिरीक्त ऊसाचे करायचे काय हा सवाल कायम आहे. कारण मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई तालुक्यात कालावधी संपूनही ऊस हा वावरातच आहे. त्यामुळे गाळपाचे योग्य नियोजन करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अशी आहे मराठवाड्यातील साखर कारखान्यांची स्थिती

मराठवाड्यातील एकूण 54 साखर कारखान्यांच्या माध्यमातून ऊसाचे गाळप सुरु आहे. 15 ऑक्टोंबर नंतरच या विभागातील साखर कारखान्यांचे गाळप सुरु झाले होते. आता तीन महिन्यानंतर गाळपाने वेग पकडला आहे. त्यामुळेच 1 कोटी 14 लाख 23 हजार टन ऊसाचे गाळप झाले असून या माध्यमातून 1 कोटी लाख 825 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा उतारा जास्त आहे तर सर्वात कमी बीड जिल्ह्यातील उतारा कमी आहे.

अतिरीक्त ऊसाचा प्रश्न निघेल का मार्गी

ऊसाचे गाळप मोठ्या प्रमाणात होत असले तरी, मराठवाड्यात अतिरीक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई तालुक्यात हा प्रश्न प्रकर्षाने समोर आले आहेत. ऊस तोडणी न झाल्यामुळे फडातच ऊसाला तुरे फुटले आहेत. त्यामुळे कारखान्याने ऊस तोडणीचा बंदोबस्त करण्याचा मागणी शेतकरी करीत आहेत. 11 ते 13 महिन्यांमध्ये ऊसाचे गाळप होणे गरजेचे आहे. वाढीव काळामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे कारखान्याने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त किंवा क्षमतेप्रमाणे सुरु असणारे साखर कारखाने अतिरीक्त ऊसाचा प्रश्न निकाली काढतील का पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

दोन साखर कारखान्यांचा राहिला नाही सहभाग

मराठवाड्यात 56 साखर कारखाने आहेत. त्यापैकी 54 साखर कारखान्यांच्या माध्यमातून पूर्ण क्षमतेने गाळप करण्यात आले होते. त्याचमुळे मराठवाड्यात कधी नव्हे ते साखरेचे एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झाली आहे. वाढत्या क्षेत्राचा विचार करीता गाळपाचेही योग्य नियोजन होणे गरजेचे आहे अन्यथा शेतकऱ्यांचे नुकसान भरुन कसे निघेल हा प्रश्न कायम आहे.

संबंधित बातम्या :

Pomegranate Cultivation : डाळिंब क्षेत्राची राज्यात घट परराज्यात वाढ, काय आहेत कारणे?

स्वप्न सत्यात, महिन्याभरापूर्वीच निर्णय आता मंजुरीही, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काय आहे खुशखबर..!

Sorghum Crop : त्यांनी सिंमेंटच्या जंगलात ज्वारीचे पीक घतले पण उत्पादनासाठी नाही तर…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें