AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉडर्न शेतीतून शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा, प्रीसिजन फार्मिंगमधून वाढेल उत्पादन

प्रिसिजन फार्मिंग ही एक प्रकारची शेती व्यवस्थापन प्रणाली आहे, ज्यात शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. (The greatest benefit to farmers from modern farming, will increase production from precision farming)

मॉडर्न शेतीतून शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा, प्रीसिजन फार्मिंगमधून वाढेल उत्पादन
| Updated on: Apr 16, 2021 | 4:27 PM
Share

नवी दिल्ली : आजच्या काळात पारंपारिक शेती पद्धती ऐवजी नवनवीन तंत्रज्ञान वापरुन शेती करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात कमालीची वाढ होत आहे. एका अंदाजानुसार 2050 पर्यंत जगातील लोकसंख्या 10 अब्जांवर पोचणार आहे. अशा परिस्थितीत कृषी उत्पादनाच्या बाबतीतही भारताला अधिक वाढ करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि कमाई वाढवण्यासाठी नवीन प्रकारची शेती प्रभावी ठरत आहे. याला प्रिसिजन फार्मिंग म्हणतात. आज आम्ही आपल्याला प्रिसिजन फार्मिंगबाबत अनेक महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत आहे. (The greatest benefit to farmers from modern farming, will increase production from precision farming)

प्रिसिजन फार्मिंग म्हणजे काय?

सर्व प्रथम प्रिसिजन फार्मिंग म्हणजे काय ते जाणून घ्या. यानंतर नवीन युगातील या शेतीत काय करावे लागेल आणि कोणत्या प्रकारचे आव्हान आहेत याची माहिती घ्या. प्रिसिजन फार्मिंग ही एक प्रकारची शेती व्यवस्थापन प्रणाली आहे, ज्यात शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. लागवडीच्या मातीपासून ते बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा अचूक वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकर्‍यास शेतीबाबत योग्य ते निर्णय घेण्याची सवलत मिळते. त्यांना नशिबाच्या भरवशावर रहावे लागत नाही.

पिकाशी संबंधित प्रत्येक लहान माहिती उपलब्ध

अशा तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीचा वाढता खर्च आणि नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसानदेखील टाळता येऊ शकते. हे पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी करण्यास देखील मदत करते. प्रिसिजन फार्मिंगमध्ये आधुनिक तांत्रिक उपकरणे वापरली जातात. यामध्ये सेन्सरच्या मदतीने पिके, माती, तण, तुकडे किंवा वनस्पतींमध्ये होणा-या आजारांची स्थिती शोधता येते. या तंत्राच्या सहाय्याने पिकातील प्रत्येक छोट्या बदलाचे परीक्षण केले जाऊ शकते. 1980 च्या दशकात अमेरिकेत सुरू झालेले हे तंत्रज्ञान आता जगभरात स्वीकारले जात आहे. नेदरलँडमध्ये या तंत्राने बटाट्याची शेती केली जात आहे. या तंत्राच्या मदतीने बटाट्यांची योग्य गुणवत्ता आणि उत्पादन वाढविण्यात मदत झाली आहे. शेतीच्या या पध्दतीमुळे शेतकऱ्यांना शेतीचा खर्च कमी करण्यास आणि नफा वाढविण्यात मदत झाली आहे.

प्रिसिजन फार्मिंगचे फायदे

– यामुळे कृषी उत्पादकता वाढविण्यात मदत होते. – मातीचे आरोग्य बिघडत नाही. – पिकामध्ये जास्त रसायनाची गरज भासणार नाही. – पाण्यासारख्या संसाधनांचा योग्य आणि पुरेसा वापर केला जातो. – पिकाची गुणवत्ता व उत्पादकता वाढविण्यात मदत होते. – शेतीसाठी लागणारा खर्च कमी असतो. – या प्रकारच्या शेतीमुळे शेतकर्‍यांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.

काय आहे आव्हान?

प्रिसिजन फार्मिंगवर केलेल्या अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की यासाठी सर्वात मोठे आव्हान योग्य शिक्षण आणि आर्थिक स्थिती आहे. भारतात या शेतीबद्दल स्थानिक तज्ज्ञ, निधी, या पद्धतीची पूर्ण माहिती इत्यादींचा अभाव आहे. यासाठी प्रिसिजन फार्मिंगचा प्रारंभिक खर्च देखील खूप जास्त असतो. (The greatest benefit to farmers from modern farming, will increase production from precision farming)

इतर बातम्या

PPF गुंतवणूकदारांसाठी खूशखबर; व्याजदर वाढवणे आणि मॅच्युरिटी कालावधी घटवण्याच्या सूचना

Photo : सुट्टी मिळण्यासाठी अशीही शक्कल, 37 दिवसात एकाच मुलीसोबत चार वेळा लग्न आणि 3 वेळा घटस्फोट

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.