Photo : सुट्टी मिळण्यासाठी अशीही शक्कल, 37 दिवसात एकाच मुलीसोबत चार वेळा लग्न आणि 3 वेळा घटस्फोट

एका बँकेच्या कर्मचार्‍यानं 37 दिवसात एकाच मुलीसोबत चार वेळा लग्न केलं आणि त्याच मुलीशी तीन वेळा घटस्फोट घेतला. (getting married to the same girl four times in 37 days and getting divorced 3 times just for paid leave)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:32 PM, 16 Apr 2021
1/8
Wedding
तैवानमधील अशा एका लग्नाचा प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटेल. याठिकाणी एका बँकेच्या कर्मचार्‍यानं 37 दिवसात एकाच मुलीसोबत चार वेळा लग्न केलं आणि त्याच मुलीशी तीन वेळा घटस्फोट घेतला. हे प्रकरण जेव्हा कोर्टात पोहोचलं तेव्हा यामागचे कारण उघडकीस आले.
2/8
Wedding
हे प्रकरण तैवानमधील एका बँक कर्मचार्‍याशी संबंधित आहे. हा व्यक्ती बँक लिपीक म्हणून काम करतो. तैवानच्या राष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, जेव्हा या व्यक्तीनं लग्नासाठी सुट्टी मागितली तेव्हा केवळ 8 दिवसांची रजा मंजूर झाली. त्या व्यक्तीचं लग्न झाले आणि काही दिवसांनी सुट्टी संपली.
3/8
Divorce
कायद्यानुसार लग्नासाठी 8 दिवसाची पगाराची रजा मिळू शकते. मग सुट्टी कशी वाढवायची हे त्यानं शोधून काढलं. या व्यक्तीनं पुन्हा पगारीची सुट्टी मिळावी म्हणून आपल्या स्वत:च्या पत्नीला घटस्फोट दिला.
4/8
अहवालानुसार, या व्यक्तीनं एकाच मुलीशी म्हणजेच त्याच्या स्वतःच्या पत्नीसोबत चार वेळा लग्न केलं आणि 37 दिवसात 3 वेळा घटस्फोट दिला. या प्रकरणाचा खुलासा देखील प्रचंड वेगळ्या मार्गानं करण्यात आला. त्यानंतर ही बाब न्यायालयात पोहोचली.
5/8
Wedding
हा व्यक्ती नेमकं काय करण्याचा प्रयत्न करतो याता शोध बँकेनं घ्यायचं ठरवलं. बँकेनं प्रथम त्याला अतिरिक्त पगाराची रजा देण्यास नकार दिला. जेव्हा बँकेने रजा मंजूर केली नाही तेव्हा त्या व्यक्तीने शहर कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली आणि बँकेवर कामगार रजेचे नियम मोडल्याचा आरोप केला.
6/8
Wedding
या कायद्यानुसार कर्मचार्‍यांना लग्नासाठी 8 दिवसाची पगारी रजा मिळणे बंधनकारक आहे. या कर्मचाऱ्यानं चार वेळा लग्न केलं होतं, त्यामुळे तिला 32 दिवसांची पगाराची रजा मिळायला हवी होती.
7/8
Wedding
मात्र नंतर कामगार कोर्टाने असे सांगितले की बँकेच्या लिपिकाने रजेसाठी जे केले ते चुकीचे आहे, परंतु कामगार कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही की ज्यात कोणालाही त्याच व्यक्तीशी लग्न करण्यासाठी सुट्टी देण्यास मनाई केली करावी. त्या व्यक्तीला रजा न दिल्याबद्दल बँकेने 700 डॉलर दंड भरावा.
8/8
Divorce
सध्यातरी या व्यक्तीला कामावरुन काढण्यात आलं की नाही हे समोर आलेलं नाही, मात्र या लग्नाची सर्वत्र चर्चा होतेय. अनेक लोक सुट्ट्या मिळण्यासाठी वेगवेगळी कारण सांगत असतात मात्र या व्यक्तीनं दिलेलं हे कारण अनोखं ठरतंय.