ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांच्या घडावर परिणाम, फळबागांचे असे करा व्यवस्थापन

| Updated on: Nov 19, 2021 | 6:16 PM

वातावरणातील बदलामुळे पुणे जिल्ह्यातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी थेट घडात साचल्याने शेतकऱ्यांना घड हे बांधावर फेकून द्यावे लागले होते. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कॅनॉपी व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांच्या घडावर परिणाम, फळबागांचे असे करा व्यवस्थापन
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : मध्यंतरी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते तर आता ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांनाही धोका निर्माण झाला आहे. सध्या द्राक्ष लागवड क्षेत्रामध्ये कमी-अधिक पाऊस पडत आहे. या पावसामुळे वाढीच्या विविध अवस्थेतील द्राक्ष बागांवर कीड- रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे पुणे जिल्ह्यातील द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे पाणी थेट घडात साचल्याने शेतकऱ्यांना घड हे बांधावर फेकून द्यावे लागले होते. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन कॅनॉपी व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

द्राक्ष बागा ह्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, अवकाळी पावसाच्या अवकृपेमुळे या बांगावर भुरी व केवडा रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे योग्य वेळेत व्यवस्थापन केले तर संभाव्य धोका हा टळणार आहे.

द्राक्ष बागेत मोकळी कॅनोपी गरजेची

पावसामुळे बागेतील आर्दता वाढली असून काडीवर कॅनॉपीही जास्त प्रमाणात तयार झालेली आहे. पाऊस आणखी काही दिवस राहीला तर घड कुजण्याची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे लवकर फळछाटणी झालेल्या बागांमध्ये द्राक्ष घड वाढीच्या अवस्थेत आहेत. या बागांमध्ये सध्याच्या वाढलेल्या आर्द्रतेमुळे भुरी व केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. बागेत मोकळी कॅनोपी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सूक्ष्म वातावरण निर्माण होणार नाही. सर्वसामान्य दाट कॅनॉपीमधे रोगकारक घटकांची वेगाने वाढ होते व त्याचा प्रसार घडापर्यंत होतो. हे टाळणासाठी प्रत्येक काडी सुटसुटीत राहील याकडे लक्ष गरजेचे आहे.

असे करा व्यवस्थापन

बागेमध्ये काड्या तारेवर बांधून घ्याव्यात. काडीवर निघालेल्या बगलफुटीसुद्धा काढून घ्याव्या लागणार आहेत. त्याचबरोबर काडीच्या तळातील 3 ते 4 पाने काढून दोन फांद्या दरम्यान योग्य अंतर ठेवले तर वेलीमध्ये योग्य हवा खेळती राहणार आहे. त्यामुळे फवारणी पूर्ण कॅनॉपीमध्ये होईल सूर्यप्रकाश प्रत्येक भागाला मिळाल्यामुळे रोगांच्या प्रसारास आळा घालता येईल पानाच्या पृष्ठभागावर बुरशीनाशक, धूळ किंवा स्टिकरचा लेप तयार होऊ देऊ नये. शिवाय द्राक्षाची पाने निरोगी व रोगमुक्त ठेवावी लागणार आहेत.

भुरी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी

फळछाटणी नंतर 40 दिवसांच्या अवस्थेतील बागांमध्ये ट्रायअझोल गटातील हेक्साकोनॅझोल किंवा डायफेनोकोनॅझोल 1 मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. फळ छाटणीनंतर 30 ते 35 दिवसांच्या अवस्थेतील बागांमध्ये जयमेथोमॉर्फ किंवा मॅडीप्रोपेमाइड 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तर केवडा रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या बागेत अमिसलब्रोम 150 मिलि पाण्यात मिसळून प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

ठरलं तर मग, आता बाजार समित्यांमध्ये 50 किलो वजनाचीच गोणी, प्रशासन अन् संघटनांच्या बैठकीत निर्णय

कांदा बीजोत्पातदन पध्दती, उत्पादन वाढविण्यासाठी महत्वाची प्रक्रिया

शेतकरी उत्पादक कंपन्यांचा असा ‘हा’ फायदा, शेतीमालाची विक्री अन् मोबदला एकाच जागी