Chickpea Crop : हरभऱ्याचे उत्पादन वाढले अन् दर घसरले, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय

| Updated on: May 03, 2022 | 1:31 PM

नाफेडच्या माध्यमातून राज्यात हरभरा खरेदी सुरु करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच खुल्या बाजापेठेपेक्षा अधिकचा दर हा हमीभाव केंद्रावर आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारपेठेतच हरभरा विक्रीवर भर दिला होता. मात्र, दरातील तफावत ही 300 रुपयांची होती. आता हीच तफावत 1 हजार 200 वर गेली आहे. त्यामुळे साठवणूक अन्यथा हमीभाव केंद्रावरच विक्री हाच पर्याय आता शेतकऱ्यांसमोर आहे.

Chickpea Crop : हरभऱ्याचे उत्पादन वाढले अन् दर घसरले, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय
हरभरा खरेदी केंद्र
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लातूर : रब्बी हंगामात पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादनवाढीचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला आणि त्याला यशही मिळाले. यंदा (Chickpea Crop) हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. असे असतानाही उत्पन्नवाढीबाबत शेतकऱ्यांची मात्र, निराशा झाली आहे. कारण हंगाम सुरु झाल्यापासून केवळ एक वेळेस (Guarantee Rate) हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाला होता. गेल्या आठ दिवसांपासून आवक असलेल्या सोयाबीन, तूर आणि (Chickpea Rate) हरभऱ्याच्या दरात घसरण सुरु आहे. अधिकची आवक असताना प्रक्रिया उद्योजकांनी हरभऱ्याची साठवणूक केली तर आता आवक असूनही मागणी नसल्याने हरभऱ्याचे दर हे 4 हजार 100 रुपयांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता हमीभाव खरेदी शिवाय पर्यायच उरलेला नाही. हमीभाव केंद्र आणि खु्ल्या बाजारपेठेतील दरात 1 हजार 100 रुपयांचा फरक आहे.

मागणी घटली आवक वाढली

सध्या सर्वच शेतीमालाची आवक वाढली आहे. खरिपातील सोयाबीन अंतिम टप्प्यात असताना साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. आता आवक वाढली असून दरात घसरण सुरु झाली आहे. यापूर्वी दर घटल्यास आवक कमी होत होती. दराचा अंदाज घेऊन शेतकरी शेतीमाल आणत असत मात्र, आता दराचे चित्र बदलले आहे. गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनच्या दरात घसरणच सुरु आहे. आता दरात वाढ होण्याची आशा धुसर होत असल्याने शेतकरी आहे त्या किंमतीमध्ये सोयाबीन विक्रीचा प्रयत्न करी आहेत.

आता हमीभाव केंद्राचा आधार

नाफेडच्या माध्यमातून राज्यात हरभरा खरेदी सुरु करण्यात आली आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच खुल्या बाजापेठेपेक्षा अधिकचा दर हा हमीभाव केंद्रावर आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी खुल्या बाजारपेठेतच हरभरा विक्रीवर भर दिला होता. मात्र, दरातील तफावत ही 300 रुपयांची होती. आता हीच तफावत 1 हजार 200 वर गेली आहे. त्यामुळे साठवणूक अन्यथा हमीभाव केंद्रावरच विक्री हाच पर्याय आता शेतकऱ्यांसमोर आहे. हरभरा आणि तुरीची विक्री खरेदी केंद्रावरच केल्यास शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

असे आहेत शेतीमालाचे दर

सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन, हरभरा आणि तूरीची आवक सुरु आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनच्या दरात घसरण सुरुच आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6 हजार 700 रुपये दर आहे तर हरभऱ्याला 4 हजार 100 असा दर आहे. तुरीच्या दरातही घसरणच सुरु आहे. तुरीला 6 हजार 300 हमीभाव आहे तर खुल्या बाजारपेठेत 6 हजार 100 असा दर आहे. एकंदरीत सर्वच शेतीमालाच्या दरात घसरण सुरु असून शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करुनच विक्री करण्याचा सल्ला व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिला आहे.