शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मोठा बदल, दलालांना चाप

Land Buying And Selling: जमीन आणि घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील अनागोंदीला आता चाप बसणार आहे. जमीन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.

शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मोठा बदल, दलालांना चाप
शेतकर्‍यांसाठी मोठी बातमी! जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मोठा बदल
| Updated on: Nov 13, 2026 | 1:35 PM

Land Transaction Digital Process: जमीन अथवा घर खरेदी-विक्री व्यवहारात मोठा बदल झाला आहे. या व्यवहारात अनेकदा फसवणूक होत होती. त्याला आळा घालण्यासाठी सरकारने मोठे पाऊल टाकले आहे. दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे. जमीन खरेदी-विग्री व्यवहारांमध्ये हमीदाराची, ओळखीच्या व्यक्तीची, साक्षीदाराची गरज उरलेली नाही. यापुढे दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी सर्व पक्षकारांचे आधार प्रमाणीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे दलालांना मोठी चाप बसणार आहे.

नोंदणीचे नियम काय?

Loading...

यापूर्वी व्यवहारासाठी अंगठ्याचा छाप, थम्ब घेण्यात येत असे. तो जुळला नाही तर दोन साक्षीदार उभे करून हा व्यवहार पूर्ण होत होता. पण याचा गैरफायदा घेऊन जमीन खरेदी-विक्रीत फसवणूक वाढली. बोगस व्यवहार वाढले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने ही साक्षीदाराची सोय बंद केली आहे. नवीन नियमांनुसार, जर फिंगरप्रिंटद्वारे प्रमाणीकरण होत नाही तोपर्यंत कोणताही दस्त नोंदवला जाणार नाही.

डिजिटल यंत्रणेच्या वापराने फसवणूक टळणार

नवीन ऑनलाईन पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पक्षकारांकडे अँड्रॉईड 9.0 अथवा त्यापुढील अद्ययावत स्मार्टफोन, इंटरनेट सुविधा आणि अधिकृत आधार ॲप असणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्यासाठी नागरिकांनी नोंदणीचे सोपास्कार दुय्यम निंबधक कार्यालयात जाण्यापूर्वी पूर्ण करायचे आहे. मोबाईलमधील आधार ॲप द्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गैरप्रकाराला आळा

या शासन निर्णयाचे स्वागत होत असले तरी दुय्यम निबंधक कार्यालय आणि तिथली यंत्रणा अधिक व्यापक आणि अद्ययावत करण्याची मागणी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणची ही कार्यालय अत्यंत कोंदट, सोयी-सुविधांचा अभाव असलेली आहे. कोंडवाड्यासारख्या या कार्यालयात नवीन नियम राबवणे हे जिकरीचे होणार असले तरी हा बदल आवश्यक असल्याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. या नवीन नियमांमुळे थंब व्हेरिफिकेशन न होता होणाऱ्या व्यवहारांना चाप बसणार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक टळणार आहे. त्यांच्या मेहनतीचा पैसा अशा व्यवहारात फसणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us