Vineyard : 10 वर्ष बाग जोपासली अन् एका दिवसात द्राक्षाच्या घडासह बांधावर फेकली, अवकाळीने तोंडचा घास हिसकावला

| Updated on: May 29, 2022 | 3:56 PM

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा आंबा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील नारी, कारी, गोरमाळा, पिंपरी(सा) या भागात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली ती शेवटपर्यंत कायम राहिली.

Vineyard : 10 वर्ष बाग जोपासली अन् एका दिवसात द्राक्षाच्या घडासह बांधावर फेकली, अवकाळीने तोंडचा घास हिसकावला
Follow us on

सोलापूर : हंगामाच्या सुरवातीपासूनच (Vineyard) द्राक्ष बागांवर (Unseasonable Rain) अवकाळीचे संकट होते. मात्र, 10 वर्षाचा अनुभव आणि परिश्रमाची तयारी या जोरावर बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा) येथील अशोक वायकर यांनी दीड एकरातील बाग जोपासलीच. केवळ जोपासलीच नाही योग्य पध्दतीने जोपासना केल्याने व्यापारीही सौद्यासाठी बांधावर आले. एवढेच नाहीतर (Adverse conditions) प्रतिकूल परस्थितीमध्ये अशोक वायकर यांना 34 रुपये किलो असा दरही मिळाला. इथपर्यंत सर्वकाही सुरळीत होते पण मध्यंतरी झालेल्या अवकळीने वायकर यांच्या स्वप्नांचा चकणाचूर केला आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिसकावला आहे. 10 वर्षाची मेहनत, वर्षाकाठी लाखोंचा खर्च एका रात्रीतून हेत्याच नव्हतं झालं. आता पुढील हंगाम घेण्यासाठी पिकलेल्या द्राक्षाच्या घडासह वेली बांधावर टाकण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे.

हंगामाच्या अंतिम टप्प्यापर्यंत अवकाळी अवकृपा

निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा आंबा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील नारी, कारी, गोरमाळा, पिंपरी(सा) या भागात द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली ती शेवटपर्यंत कायम राहिली. आता छाटणीच्या दरम्यानच सोलापूर जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली होती. यामध्ये एकट्या वायकर यांचे 17 लाखाचे नुकसान झाले आहे. असे अनेक शेतकरी तालुक्यात असून शासनाने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत.

पिकवलेली द्राक्ष मातीमोल, 17 लाखाचे नुकसान

दिवसाकाठी औषधांचा मारा, वेलींची पाहणी आणि छाटणी अशा एक ना अनेक प्रकारे द्राक्ष बागेची जोपासणा करावी लागते. ही सर्व प्रक्रिया पू्र्ण करुन आता केवळ द्राक्ष विक्री आणि त्या मोबदल्यात पैसे घेणे एवढेच बाकी होते, पण सौदा झालेल्या बागेचीही छाटणी अवकाळीने होऊ दिली नाही. पिकवलेली द्राक्ष मातीमोल झाल्याने त्यांचे सोळा ते सतरा लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले असून भविष्यात कुटूंबासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय.तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेली द्राक्ष खराब होताना पाहून बळीराजा मात्र धास्तावला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.

हे सुद्धा वाचा

पुढील हंगामासाठी छाटणी गरजेचीच

हंगाम संपला की पुढील हंगामासाठी द्राक्ष बागेची छाटणी ही करावीच लागते. त्यानुसार वायकर यांनीही द्राक्ष बागेची छाटणी केली. फरक फक्त ऐवढाच की पिकलेली द्राक्ष बागेवर असताना वायकर यांना हे पाऊल उचलावे लागले. यामध्ये त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.