Weather Alert: राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबई वेधशाळेचा इशारा इशारा, सटाणा, पिंपरी चिंचवडला झोडपलं

हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिकच्या सटाणा तालुक्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पावसानं हजेरी लावलीय. rain with thunderstorm in Pune, Satara and Nashik

Weather Alert:  राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबई वेधशाळेचा इशारा  इशारा, सटाणा, पिंपरी चिंचवडला झोडपलं
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा सुरुच आहे. सोमवारी कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली होती. कोल्हापूरमध्ये गारपीट झाली होती. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी  यांनी मुंबई वेधशाळेचा अंदाजानुसार पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाशिकच्या सटाणा तालुक्यात पावसानं हजेरी लावलीय. (IMD Mumbai alert rain with thunderstorm in Pune, Satara and Nashik)

पुणे सातारा , नाशिकला पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेच्या अंदाजानुसार पुणे, सातारा आणि नाशिकला विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. वेधशाळेनं या ठिकाणच्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

के.एस. होसाळीकर यांचं ट्विट

सटाणा तालुक्याला पावसानं झोडपलं

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील मुल्हेर,हरणबारी,जेतापूर,मालीवाडे या भागाला पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दमदार पाऊस झाल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पिंपरी चिंचवडमध्येही पावसाची हजेरी

पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये गारपीट देखील सुरु आहे. दुपार पासून उन्हाचा तडाखा वाढला होता. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना गरमी पासून दिलासा मिळाला आहे.

कोल्हापूरमध्ये गारपीट

कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला आहे. जोरदार गारपिटीसह मुसळधार पावसानं सोमवारी हजेरी लावली होती. कागल तालुक्यात जोरदार गारपीट झाली. चंदगड आणि भुदरगड तालुक्‍यातील काही ठिकाणी गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं. तर ,सेनापती कापशी गावातील रस्ते गारपिटीमुळे पांढरेशुभ्र झाले होते.

संबंधित बातम्या:

Maharashtra Weather Alert | पुढचे चार दिवस महत्त्वाचे, महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

केंद्राने मंजूर केलेला ऑक्सिजन प्लांट आणि निधी गेला कुठे?; प्रसाद लाड यांचा सरकारला सवाल

(IMD Mumbai alert rain with thunderstorm in Pune, Satara and Nashik)