Papaya : पपईची लागवड साधली की उत्पन्नाची हमी, काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला?

| Updated on: Feb 04, 2022 | 3:32 PM

उत्तर भारतासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सध्या पपई लागवडीची तयारी सुरु केली आहे. पपईची लागवड ही मार्च-एप्रिलमध्ये होत असली तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या रोपवाटिकेची तयारी केली जात आहे. या दरम्यान, पपईची लागवड केली तर अधिकच्या ऊनामुळे विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा कमी होतो. रोपवाटिकेतील बियाणांची गुणवत्ता महत्वाची आहे.

Papaya : पपईची लागवड साधली की उत्पन्नाची हमी, काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला?
पपई रोपांची लागवड योग्य झाली की उत्पादन वाढते
Follow us on

मुंबई : उत्तर भारतासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सध्या पपई लागवडीची तयारी सुरु केली आहे. (Papaya Cultivation) पपईची लागवड ही मार्च-एप्रिलमध्ये होत असली तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या रोपवाटिकेची तयारी केली जात आहे. या दरम्यान, पपईची लागवड केली तर अधिकच्या ऊनामुळे विषाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा कमी होतो. (Nursery) रोपवाटिकेतील बियाणांची गुणवत्ता महत्वाची आहे. पपईसारख्या फळांसाठी ज्या आधारे (Planting of plants) रोपांची लागवड प्रथम रोपवाटिकेत केली जाते, त्यानंतर मुख्य प्लॉटमध्ये रोपण करणे आवश्यक आहे. साधारणतः रोपवाटिकेत लागवड केल्यानंतर बारीक मातीच्या थराने बिया झाकल्या जातात. रोपाला कधीकधी सुर्यप्रकाश दिला जातो. शिवाय या रोपांना उंदराचा आणि पक्ष्यांचाही धोका असतो. त्यामुळे त्याची निघराणी करावी लागते. त्याच अनुशंगाने केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय फळ संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. के. सिंह यांनी शेतकऱ्यांना पपईच्या लागवडीची माहिती दिली आहे.

रोपांच्या लागवडीचे काय आहेत फायदे?

पपईसारख्या अत्यंत महागड्या बियाणांची रोपवाटिका तयार करुन लागवड केल्यानंतर नुकसान कमी होते. जमिनीचा योग्य वापर सुनिश्चित करता येतो. यामुळे पपईची चांगली वाढ आणि उत्पादकताही वाढते. नर्सरी वाढवल्याने वेळेचीही बचत होते. अनुकूल काळासाठी वनस्पती प्रत्यारोपणाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. प्रतिकूल परिस्थितीतही रोपे तयार करता येतात. नर्सरीमध्ये लागवड केल्यास परिसराची काळजी घेणे आणि देखभाल करणे सोपे आहे.

नर्सरीत माती कशी तयार करावी

प्लास्टिकच्या बोगद्याने आच्छादलेल्या मातीवर सुमारे 4 ते 5 आठवडे मातीचे अच्छादन करावे. लागवडीच्या 15-20 दिवस आधी 4-5 लिटर पाण्यात 1.5-2% फॉर्मेलिन द्रावणात माती मिसळून ती प्लास्टिकच्या पत्र्याने झाकून ठेवावी. कॅप्ट आणि थेरॅम सारख्या बुरशीनाशके देखील 2 g/ 1 लिटर या प्रमाणे तयार करावीत. त्यामुळे जमिनीतील किडीचा नायनाट होतो. फुराडॉन, हेप्टाक्लोर ही काही कीटकनाशके आहेत जी कोरड्या मातीत 4-5 ग्रॅम/ मी 2 या मापाने जोडली जातात आणि रोपवाटिका तयार करण्यासाठी 15-20 सेंमी खोलीमध्ये जोडणे आवश्यक आहे. झाकलेल्या पॉलिथीनच्या शीटखाली किमान 4 तास सतत गरम वाफेचा पुरवठा करा आणि जमिनीत बियाण्याचे बेड तयार करा.

अशी करा रोपांची लागवड

एक एकरासाठी 4 हजार 50 झाडे ही पुरेशी आहेत. त्यात कागदाचा 2.5 x 10 x ०.5 मी आकाराचा एक करून वरील मिश्रण चांगले मिक्स करून समतल करून घ्या. यानंतर मिश्रण प्रक्रिया केलेल्या बियांची 3′ x 6′ अंतरावर 1/2′ खोलीवर रांग तयार करून नंतर 1/2′ शेणखताच्या खताच्या मिश्रणाने झाकून घ्यावे व त्यावर लाकडाने दाबावे लागणार आहे. जेणेकरुन बिया ह्या उघड्या राहणार नाहीत. पेरलेले बेड कोरड्या गवताने किंवा पेंढ्याने झाकून ठेवा आणि त्यांना सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्या. लागवडीनंतर साधारण 15-20 दिवसांतच बियाणांची उगवण होते. जेव्हा या झाडांना 4-5 पाने व त्याची उंची 25 सेंमी होते. यानंतर दोन महिन्यामध्ये ज्या ठिकाणी लागवड करायची आहे तिथे नेऊन त्याची लागवड करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Crop Insurance : पीकविम्याबाबत राज्य सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा?

Soybean Rate : दोन महिन्यांपासून सोयाबीनचे दर स्थिरावलेलेच, आता शेतकऱ्यांकडे एकच पर्याय..!

Seed Production : जे शासनाला जमलं नाही ते कृषी सहायकाने करुन दाखवंल अन् सोयाबीनच्या बाबतीत गाव स्वयंपूर्ण झालं