Kharif Season : यंदा सोयाबीन अन् कापसामध्येच स्पर्धा, कृषी विभागाने वर्तविला खरिपाचा अंदाज

| Updated on: May 01, 2022 | 10:10 AM

शेतीमालातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच पीक पध्दती ही ठरलेली आहे. गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाचे झालेले नुकसान पाहता यंदा खरिपात काय होणार अशी शंका उपस्थित केली जात होती. पण सोयाबीन आणि कापसाला मिळालेल्या दरातून खरिपातील चित्र स्पष्ट झाले आहे. उत्पादन घटले तरी उत्पन्न वाढल्याने आता यंदाच्या हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार हे स्पष्ट झाले आहे.

Kharif Season : यंदा सोयाबीन अन् कापसामध्येच स्पर्धा, कृषी विभागाने वर्तविला खरिपाचा अंदाज
बियाणे
Follow us on

अकोला : यंदाच्या विक्रमी दराचा परिणाम हा खरिपातील (Crop Sowing) पीक पेरणीवरही होणार आहे. विदर्भात (Kharif Season) खरिपात कापूस हे मुख्य पीक आहे तर मराठवाड्यात सोयाबीन. यंदाच्या हंगमात कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी मराठवाड्यापेक्षा विदर्भातच याचा अधिकचा परिणाम जाणवणार आहे. त्यामुळे (Vidarbh Division) विदर्भात कापसाचे आणि मराठवाड्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनावर परिणाम झाला असला तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपात सोयाबीन आणि कापसामध्येच स्पर्धा होणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

वाढीव दराचा ‘असा’ हा परिणाम

शेतीमालातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच पीक पध्दती ही ठरलेली आहे. गतवर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाचे झालेले नुकसान पाहता यंदा खरिपात काय होणार अशी शंका उपस्थित केली जात होती. पण सोयाबीन आणि कापसाला मिळालेल्या दरातून खरिपातील चित्र स्पष्ट झाले आहे. उत्पादन घटले तरी उत्पन्न वाढल्याने आता यंदाच्या हंगामात सोयाबीन आणि कापसाच्या क्षेत्रात वाढ होणार हे स्पष्ट झाले आहे. यंदा पीक पध्दतीमध्ये बदल न करता आहे त्या सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन वाढवण्यावर शेतकऱ्यांचा भर राहणार आहे.

अकोला जिल्ह्यातील खरीप क्षेत्र

अकोला जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र हे 4 लाख 89 हजार एवढे आहे. यापैकी सोयाबीन 2 लाख 20 हजार हेक्टरावर तर कपाशीचे पीक हे 1 लाख 60 हजार हेक्टरावर अपेक्षित आहे. सोयाबीन, कापूस वगळता तूर 55 हजार, उडीद 16 हजार, ज्वारी 6 हजार तर मका 250 हेक्टर असे सरासरी क्षेत्र आहे. सोयाबीन आणि कापसाची लागवड ही सरासरीपेक्षा अधिक होईल असा अंदाज आहे. या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांना प्रतिकूल परस्थितीमध्ये तारले आहे. त्यामुळे या पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.

हे सुद्धा वाचा

असे लागेल बियाणे

शेतकऱ्यांसह कृषी विभागही कामाला लागला आहे. यंदा सोयाबीन 1 लाख 65 हजार क्विंटल, तूर 2,888, मूग 994, उडीद 767, ज्वारी 450, मका 38, बाजरा कपाशी 4 हजार क्विंटल बियाणे लागेल. याबाबत कृषी विभागाकडून आयुक्तालयाकडे मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सोयाबीन हेच प्रमुख खरिपाचे पीक राहिलेले आहे. यावर्षी सुमारे सव्वा दोन लाख हेक्टरपर्यंत लागवड शक्य आहे. वाढत्या दरामुळे सोयाबीन लागवडीला शेतकऱ्यांची पसंती राहणार आहे.