कामगंध सापळ्यातून कीडीचे व्यवस्थापन नेमके होते कसे? व्यवस्थापनात सापळ्यांची भूमिका काय?

| Updated on: Nov 11, 2021 | 1:26 PM

पिकांमधील आळीचा बंदोबस्त करायाचा असेल तर कामगंध सापळ्याची उभारणी करा इथपर्यंतच आपण ऐकलेले आहे. मात्र, कीडीचे व्यवस्थापन नेमके होते कसे आणि कामगंध सापळ्याची काय भुमिका आहे याची माहितीही असणे आवश्यक आहे. याबाबत शेतकरी अनभिज्ञ असेल तर नेमके सापळा बसवण्याचा उद्देश काय याची माहितीही होणार नाही.

कामगंध सापळ्यातून कीडीचे व्यवस्थापन नेमके होते कसे? व्यवस्थापनात सापळ्यांची भूमिका काय?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : पिकांमधील आळीचा बंदोबस्त करायाचा असेल तर कामगंध सापळ्याची उभारणी करा इथपर्यंतच आपण ऐकलेले आहे. मात्र, कीडीचे व्यवस्थापन नेमके होते कसे आणि कामगंध सापळ्याची काय भुमिका आहे याची माहितीही असणे आवश्यक आहे. याबाबत शेतकरी अनभिज्ञ असेल तर नेमके सापळा बसवण्याचा उद्देश काय याची माहिती ही होणार नाही. त्यामुळे सापळे कीडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उभारले जातात पण नेमकी काय प्रक्रिया होते आणि पिकांचे किडीपासून संरक्षण होते हे आपण आज पाहणार आहोत.

काही किटकांचे कृत्रिम रित्या तयार केलेले फेरोमोन विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. सर्वसाधारणपणे मादी पतंगाच्या कामगंधा द्वारे नर पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडून त्यांचा नाश करून म्हणजेच त्यांच्या मिलना मध्ये बाधा निर्माण करून पतंग वर्ग किडीचे व्यवस्थापन मिळण्यासाठी फेरोमन चा मोठ्या प्रमाणात वापर वाढत आहे. कापूस, तुर, हरभरा सोयाबीन यासारख्या पिकात वापर होत आहे. कामगंधाने विरुद्धलिंगी कीटक परस्पराकडे मिलनासाठी आकर्षित होतात या तत्त्वाचा वापर व्यवस्थापनासाठी करता येतो.

असे करा पिकाचे संरक्षण

किडींचे सर्वेक्षणासाठी एक हेक्टर क्षेत्रात सर्वसाधारणपणे पाच कामगंध सापळे पुरेसे आहेत त्यांचा वापर सनियंत्रणाकरिता करता येतो. सर्वसाधारणपणे पीक संरक्षण उपाय सुरू करण्यापूर्वी सापळ्यात कमीत कमी किती पतंग अडकले आहेत याची खात्री करावी. सोयाबीन पिकात स्पोडोप्टेरा या किडीचे सरासरी 8 आठ ते 10 नर पतंग सतत दोन-तीन दिवस आढळून आल्यास या किडीच्या व्यवस्थापनासाठीचे उपाय करणे आवश्यक आहे. सनीयंत्रणा व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात नर पतंगांना अडकवून किडींचे व्यवस्थापन मिळण्यासाठी सुद्धा कामगंध सापळ्यांचा वापर होऊ शकतो.

कापसातील गुलाबी बोंडअळीचे असे करा व्यवस्थापन

कापूस पिकातील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन मिळविण्यासाठी प्रती एकर आठ ते दहा कामगंध सापळे गुलाबी बोंड अळीच्या गोळी सह लावावे. कीटकाच्या मिलनात अडथळा निर्माण करण्यासाठी सापळ्यातून लिंग प्रलोभन रसायनाचा सूक्ष्म गंध वातावरणात पसरतो त्यामुळे मिलनासाठी सहचर शोधताना कीटकाची फसगत होते. परिणामी त्यांचे मीलन न झाल्यामुळे प्रजोत्पादन होत नाही त्यामुळे वाढणाऱ्या कीटकाच्या संख्येत घट होते. हे कामगंध सापळे वापरताना पिकाच्या उंचीच्या वर साधारणपणे 1 ते1.5 फूट उंची ठेवून वापरावे तसेच या सापळ्यातील संबंधित पिकावरील संबंधित किडी करिता वापरली जाणारी काम गंध गोळी साधारणपणे 20 दिवसानंतर बदलावी.

पिकानुसार ठरते कामगंध

सध्या बाजारात तूर व हरभरा पिकावरील घाटेअळी, सोयाबीन वरील स्पोडोप्टेरा अळी, कपाशीवरील गुलाबी बोंड आळी बोंड आळी इत्यादीची कामगंध सापळे बाजारात उपलब्ध आहेत. कामगंध सापळ्यांचा वापर योग्यवेळी योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात केल्यास किडीवर नियंत्रण येते.

संबंधित बातम्या :

नुकसानभरपाई मिळण्यास आणेवारीचा अडसर, कशी ठरवली जाते आणेवारी ?

बळीराजा जागा हो : आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्ती नाही, उरले फक्त चार दिवस

कमी-अधिकच्या पावसामुळेच कापसाचे उत्पादन घटले, दर वाढूनही फायदा काय?