AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीराजा जागा हो : आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्ती नाही, उरले फक्त चार दिवस

माहात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण हे करावे लागणार आहे. याशिवाय उर्वरीत शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. असे असतानाही अद्यापही तब्बल 78 हजार शेतकऱ्यांनी आधार हे प्रमाणीकरण केलेले नाही.

बळीराजा जागा हो : आधार प्रमाणीकरणाशिवाय कर्जमुक्ती नाही, उरले फक्त चार दिवस
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 12:16 PM
Share

औरंगाबाद : माहात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती (Mahatma Jotirao Phule Debt Relief) योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण (Aadhar authentication) हे करावे लागणार आहे. याशिवाय उर्वरीत शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. असे असतानाही अद्यापही तब्बल 78 हजार शेतकऱ्यांनी आधार हे प्रमाणीकरण केलेले नाही. अंतिम मुदतीचे अवघे 4 दिवस शिल्लक असतानाही याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 10 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत प्रमाणीकरण हे केलेले नाही. चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही.

कोरोनामुळे कर्जमुक्ती योजना ही रखडली होती. त्यामुळे शेतकरी हे या योजनेपासून वंचित राहिले होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच या कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये 3 लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता तर ज्या शेतकऱ्यांनी नियमित व्याज अदा केले आहे त्यांना प्रहोत्साहनपर 50 हजार रुपये देण्याचा निर्धार ठाकरे सरकारने केला होता. मात्र, त्यानंतर लागलीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने ह्या योजनेचे काम रखडलेले होते. आता कर्जमुक्ती होणार आहे. पण याकरिता शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची अट घालण्यात आली आहे.

यामुळेही झाला विलंब

1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2021 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांना महातत्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही सुरु करण्यात आली होती. मात्र, योजना राबवताना अनेक अडतणींचा सामना हा करावा लागलेला आहे. योजनेला सुरवात होताच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता तर कधी राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता. त्यामुळे कर्जमाफीसाठी उशीर झाला होता. आता आधार प्रमाणीकरणासाठी 15 नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली आहे. असे असतानाही राज्यातील जवळपास 78 हजार शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत हे प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.

काय आहे आधार प्रमाणीकरण?

* कोणत्याही शासकीय कामामध्ये आधार कार्ड हे आता आवश्यकच झाले आहे. आता कर्जमुक्तीसाठीही हे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक झाले आहे. प्रमाणीकरण म्हणजे थोडक्यात आपले आधार अपडेट करणे हा त्याचा अर्थ आहे. * अनेकांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी असूनही त्याची दुरुस्ती ही केली जात नाही. त्याची आवश्यकताही वाटत नाही. पण जर तुमचे नाव कर्जमुक्ती यादीत आले आहे पण कर्जमुक्ती झाली नाही तर तुम्हाला ही प्रक्रीया करावीच लागणार आहे. * आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्यास सुरवातीला आधार केंद्रावर जावे लागणार आहे. आधार कार्डमध्ये काही चुका झाल्या असतील त्या निदर्शनात आणून द्याव्या लागणार आहेत. यामध्य बदह करण्यासाठी तुमच्याकडे त्या बदलासंदर्भातले प्रूफ असणे आवश्यक आहे. याकरिता मतदान कार्ड, पॅनकार्ड, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला जवळ असणे आवश्यक आहे. * यापुर्वी आधार कार्डवर केवळ संबंधित व्यक्तीचे जन्माचे वर्षाचा उल्लेख केला जात होता. पण आता तारीख, महिना यासह उल्लेख अनिवार्य झाला आहे. अशा दुरुस्त्या शेतकऱ्यांनी करुन घ्यायला हव्यात. * प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईल क्रमांक, जन्माचा दाखला, पॅन ही कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे. * या प्रमाणीकरणासाठी तालुका सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा बॅंकेमध्येही हे बदल करुन घेता येतात.

संबंधित बातम्या :

कमी-अधिकच्या पावसामुळेच कापसाचे उत्पादन घटले, दर वाढूनही फायदा काय?

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! मोदी सरकारने इथेनॉलच्या किमती प्रति लिटर 2.55 रुपयांनी वाढवल्या

पेट्रोल-डिझेलचे दर घटल्यानंतर आता सर्वसामान्यांना अणखीन एक दिलासा ; महाराष्ट्राचा मोठा वाटा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.