पेट्रोल-डिझेलचे दर घटल्यानंतर आता सर्वसामान्यांना अणखीन एक दिलासा ; महाराष्ट्राचा मोठा वाटा

गेल्या काही दिवसातील केंद्र सरकारचे निर्णय सर्वसामान्य जनतेच्या हिताचे ठरले आहेत. पेट्रोल- डिझेलच्या दरात मोठी घट झाल्यानंतर लागलीच मोहरीच्या तेलाचे दरही कमी झाले होते. यानंतरही एक दिलासादायक बाब म्हणजे गगणाला भिडणाऱ्या तुरीच्या डाळीच्या किमतीही आता कमी झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी ठोक बाजारात तुरीच्या डाळीचे दर हे 95 रुपयांवरुन 100 रुपयांवर पोहचले होते. आता यामध्ये घट झाली

पेट्रोल-डिझेलचे दर घटल्यानंतर आता सर्वसामान्यांना अणखीन एक दिलासा ; महाराष्ट्राचा मोठा वाटा
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 6:59 PM

मुंबई : गेल्या काही दिवसातील (Central Government) केंद्र सरकारचे निर्णय सर्वसामान्य जनतेच्या हिताचे ठरले आहेत. (Petrol-diesel Rate) पेट्रोल- डिझेलच्या दरात मोठी घट झाल्यानंतर लागलीच मोहरीच्या तेलाचे दरही कमी झाले होते. यानंतरही एक दिलासादायक बाब म्हणजे गगणाला भिडणाऱ्या (Reduction in turi dal prices) तुरीच्या डाळीच्या किमतीही आता कमी झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी ठोक बाजारात तुरीच्या डाळीचे दर हे 95 रुपयांवरुन 100 रुपयांवर पोहचले होते. आता यामध्ये घट झाली असून सध्या तुराचे दर 72 ते 75 रुपयांपर्यंत आले आहेत. त्यामुळे तुरीच्या डाळीच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 25 ते 30 रुपयांची घसरण झाली आहे. ही बाब सर्वसामान्यांसाठी दिलासादायक आहे. विशेष म्हणजे हे दर घसरण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. कारण

महाराष्ट्रातूनच या डाळीची इतर बाजार समित्यामध्ये आवक झाली आहे. प्रयागराज येथील मुथिगंज बाजार समितीमध्ये महाराष्ट्रातून डाळीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचाही परिणाम दरावर झाला असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुरीच्या आणि इतर डाळींच्या किमतीमध्ये केवळ वाढच होत होती. पण आता सर्वसामान्यांच्या आहारातील तुरीच्या डाळीचेही दर कमी झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

किरकोळ बाजारातही किमती कमी

ठोक बाजारात तुरीच्या डाळीच्या किंमतीत किलोमागे सुमारे 12 रुपयांची घट झाल्यानंतर आता किरकोळ विक्रीतही दर कमी होतील असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे घटत्या दराचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे. विशेषता: महिलांचे किचनचे बजेट कोलमडले होते ते आता पुर्वपदावर येणार आहे.

उत्तर प्रदेशच्या बाजार समित्यांमध्येही दर घसरले

दैनिक जागरणमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, महाराष्ट्रातून डाळींची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळेच दरामध्ये घट झाली आहे. तुरीची डाळ सध्या किरकोळ बाजारात 90 ते 95 रुपये किलो दराने विकली जात आहे. ज्याची किंमत आणखी कमी होण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात डाळींच्या पिकाच्या उत्पादनामुळे आवक वाढली असून, दरात मोठी घट झाल्याचेही तेलबिया व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सर्वसामान्यांना दिलासा

उत्तर प्रदेशात मोहरीचे तेलाच्या दरात प्रति लिटर 5 ते 10 रुपयांनी घट झाली आहे. खाद्यतेलाच्या किंमतीत कपात झाल्यानंतर सामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे. बरेलेतील ठोक बाजारात मोहरीचे तेल हे 168 रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर किरकोळ बाजारात 175 ते 180 रुपये प्रति लिटर प्रमाणे विकले जात आहे.

संबंधित बातम्या :

कापूस खरेदीला दारोदारी फिरत आहेत व्यापारी, दर वाढले पण उत्पादन घटले

आठ दिवसाचीच रब्बी, अवकाळी पावसाचा परिणाम उगवणीवर, दुबार पेरणीची नामुष्की

कडवट कारल्यात औषधी गुणधर्म, शेतकऱ्यांना भरघोस उत्पान्नाचीही संधी

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.