Sonakshi Sinha : मुसलमान मुलासोबत लग्न… कुटुंबियांना ऐकाव्या लागलेल्या नको त्या गोष्टींबद्दल सोनाक्षी अखेर व्यक्त झालीच
Sonakshi Sinha and Zaheer Iqbal : मुसलमान मुलासोबत लग्न केल्यामुळे अनेकांनी साधलेला सिन्हा कुटुंबावर निशाणा... सोनाक्षी सिन्हाच्या कुटुंबियांना ऐकाव्या लागलेल्या नको त्या गोष्टी... 'त्या' परिस्थितीबद्दल अभिनेत्री अखेर व्यक्त झालीच...

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने 2024 मध्ये लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केलं. आंतरधर्मीय विवाह असल्यामुळे सोनाक्षी हिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अनेकांनी अभिनेत्रीच्या लग्नाचा विरोध देखील केला. सोनाक्षीच्या लग्नात तिचे भाऊ उपस्थित नसल्याच्या चर्चांनी देखील जोर धरला. आता नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये सोनाक्षी सिन्हा हिने खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी सिन्हा हिची चर्चा रंगली आहे.
सोनाक्षी सिन्हा हिने सोहा अली खानच्या पॉडकास्टवर झहीर इक्बालसोबतच्या तिच्या आंतरधर्मीय विवाहाबाबत सुरू असलेल्या चर्चा आणि टीकेबद्दल उघडपणे सांगितलं आहे. जून 2024 मध्ये लग्न झाल्यानंतर अनेकांना अभिनेत्रीच्या लग्नाचा विरोध केला… यावर सोनाक्षी म्हणाली, ‘हा फक्त एक प्रकारचा गोंधळ आहे… कारण असं करणारी मी पहिली किंवा शेवटची महिला नाही..’
सोशल मीडियावर येतर असलेल्या नकारात्मक कमेंटबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मी एका प्रौढ महिलेची जीवन निवड आहे… ज्यांना मी ओळखतही नाही, प्रत्येकाचं काही ना काही कारणास्तव यावर मत होतं, जे मला समजू शकलं नाही. खरं सांगायचं झालं तर, तेव्हा सर्वकाही फक्त आणि फक्त आमच्या बद्दल होतं… आणि दुसरीकडे ज्या क्षणाच्या आम्ही प्रतिक्षेत होते. ते सर्व काही सत्यात घडत होतं… आम्ही प्रचंड उत्साही आणि आनंदी होतो… अखेर आम्ही एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करु शकतो आणि तो क्षण आमच्यासाठी प्रचंड खास होता…’ असं देखील सोनाक्षी म्हणाली.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘परिस्थितीचा सामना करणं कठीण होतं, विशेषतः अशा वेळी जेव्हा तुम्हाला फक्त आजू-बाजूला सकारात्मकता हवी असते… आपण सोशल मीडियाच्या जगात राहतो… म्हणून मला माझ्या टिप्पण्या थांबवाव्या लागल्या. माझ्या खास दिवशी मला स्वतःबद्दल, माझ्या जोडीदाराबद्दल किंवा माझ्या कुटुंबाबद्दल एकही नकारात्मक गोष्ट वाचायची नव्हती.’
आज सोनाक्षी आणि झहीर चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. झहीर आणि सोनाक्षी यांनी एकमेकांना 7 वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 23 जून 2024 मध्ये सोनाक्षी आणि झहीर यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते .
