AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा – झहीरच्या नात्यात दुरावा? टोकाला पोहोचलेली भांडणं, घ्यावा लागला मोठा निर्णय

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal : सोनाक्षी सिन्हा आणि झहिर इक्बाल यांच्या नात्यात दुरावा! भांडणं टोकाला पोहचल्यानंतर घ्यावा लागला मोठा निर्णय, अभिनेत्री स्वतःच म्हणली..., सध्या सर्वत्र सोनाक्षी आणि झहिर यांच्या नात्याची चर्चा..

सोनाक्षी सिन्हा - झहीरच्या नात्यात दुरावा? टोकाला पोहोचलेली भांडणं, घ्यावा लागला मोठा निर्णय
Sonakshi Sinha and Zaheer Iqbal
| Updated on: Dec 06, 2025 | 8:43 AM
Share

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल कायम चाहत्यांना कपल गोल्स देताना दिसतात. दोघांच्या लग्नाला 1 वर्ष देखील झालं आहे. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी हिने लग्नापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता असं सांगितलं… त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले आहेत, परंतु त्यांनी आव्हानांचा सामना केला आणि बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंडच्या नात्याला पती – पत्नीचं नाव दिलं. सोनाक्षीने सोहा अली खानच्या पॉडकास्टवर खुलासा केला की, रिलेशनशिपमध्ये असताना तीन वर्षांनंतर त्यांच्यातील तणाव लक्षणीय वाढला. या काळात त्यांना कपल्स थेरपी घ्यावी लागली.

सोनाक्षी आणि झहीर एकमेकांचे केस उपटण्यास होते तयार…

सोनाक्षी सिन्हाने पॉडकास्टमध्ये सांगितलं की, आमच्या नात्यात एक असा टप्पा होता जेव्हा आम्ही एकमेकांचे केस उपटण्यास देखील होते. त्या काळात आम्ही कातीही प्रयत्न केले तरी आम्हाला एकमेकांचा दृष्टिकोन समजत नव्हता. पण आम्हाला आमचं नातं टिकवायचं होतंय… अशात झहीर याने कपल थेरपी घेण्याचा सल्ला दिला.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘कपल थेरपी घेतल्यानंतर आम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागलो… थेरपीच्या फक्त 2 सेशननंतर सर्वकाही पूर्वपदावर आलं होतं…’, सांगायचं झालं तर, सोनाक्षी आणि झहीर कायम त्यांच्या नात्याबद्दल बोलत असतात.

सोनाक्षीने त्यांच्या नात्याची सुरुवात सांगताना म्हटलं की, तिची आणि झहीर याची भेट सलमान खानच्या पार्टीत झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री होती. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सोनाक्षीने झहीरला भेटल्यानंतर आठवडाभरातच “आय लव्ह यू” म्हटलं. सुरुवातीला झहीरने ती वेडी आहे असं समजून हसून ते टाळलं.

झहीर आणि सोनाक्षी यांनी एकमेकांना 7 वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 23 जून 2024 मध्ये सोनाक्षी आणि झहीर यांनी मोठ्या थाटात लग्न केलं.. लग्नानंतर त्यांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या बॅस्टियन रेस्टोरेंटमध्ये रिसेप्शन पार्टी ठेवली. जेथे अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेले.

सोनाक्षी सिन्हा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सोनाक्षी कायम झहीक याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्त करत चाहत्यांना कपल गोल्स देत असते.

Follow Us
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...