Rabi Season: कडधान्यच जोमात, मुख्य पिकांची काय अवस्था? शेतकऱ्यांचा निर्णय योग्य की अयोग्य? वाचा सविस्तर

| Updated on: Feb 13, 2022 | 10:11 AM

यंदा कधी नव्हे तो रब्बी हंगामातील पीक पध्दतीमध्ये अमूलाग्र बदल पाहवयास मिळला आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना महत्व न देता ज्यामधून अधिकचे उत्पन्न मिळेल अशाच कडधान्यांचा पेरा केला होता. यासाठी पोषक वातावरणही तयार झाले होते. पावसाने लांबलेल्या पेरण्या आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू या रब्बी हंगामाकडे दुर्लक्ष करीत हरभरा, करडई, जवस, राजमा अशा पिकांवरच भर दिला होता.

Rabi Season: कडधान्यच जोमात, मुख्य पिकांची काय अवस्था? शेतकऱ्यांचा निर्णय योग्य की अयोग्य? वाचा सविस्तर
पोषक वातावरणामुळे मोहरीचे उत्पादन वाढले आहे.
Follow us on

लातूर : यंदा कधी नव्हे तो (Rabi Season) रब्बी हंगामातील पीक पध्दतीमध्ये अमूलाग्र बदल पाहवयास मिळला आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना महत्व न देता ज्यामधून अधिकचे उत्पन्न मिळेल अशाच (Pulses) कडधान्यांचा पेरा केला होता. यासाठी पोषक वातावरणही तयार झाले होते. पावसाने लांबलेल्या पेरण्या आणि पाण्याची उपलब्धता यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू या रब्बी हंगामाकडे दुर्लक्ष करीत हरभरा, करडई, जवस, राजमा अशा पिकांवरच भर दिला होता. आता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. असे असताना रब्बी हंगामातील हरभऱ्याची तर (Market) बाजारपेठेत आवक सुरु झाली आहे करडई पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. तर दुसरीकडे ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही अवस्था लातूर विभागातील उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमधील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला पीक पध्दतीमधील बदल हाच फायद्याचा ठरत आसल्याचे चित्र आहे.

लातूर विभागातील पिकपेरा

उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामच महत्वाचा मानला जातो. पण यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्येच बदल केला आहे. लातूर विभागात यंदा सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 140 टक्के पेरा झाला आहे. म्हणजेच रब्बी हंगामासाठी सरासरी क्षेत्र हे 10 लाख 86 हजार हेक्टर असले तरी प्रत्यक्षात पेरणी मात्र, 15 लाख 26 हजार हेक्टरावर झाली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये दुप्पट पेरणी झाली असल्याचा अहवाल कृषी उपसंचालक कार्यालयामार्फत देण्यात आला आहे.

रब्बी हंगामातील पिकांची स्थिती

मराठवाड्यात ज्वारी हेच रब्बी हंगामातील मुख्य पीक आहे. मात्र, यंदा पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे. ज्वारीला मिळणारा दर आणि पेरणीपासून काढणीपर्यंतचे कष्ट यामुळे शेतकरी या मुख्य पिकाकडे पाठ फिरवत आहेत. असे असताना सध्या ज्वारी हे दाणे पक्वतेच्या अवस्थेत असतानाच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हरभऱ्याच्या क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्र हे 51 हजार हेक्टर असताना प्रत्यक्षात 1 लाख 42 हजार हेक्टरावर पेरा झाला आहे. शिवाय सध्या हे पीक काढणीला आले असून उताराही चांगला आहे. गेल्या काही दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक सुरु झाली आहे. करडईच्या क्षेत्रातही गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्य पिकांपेक्षा कडधान्यातूनच अधिकच्या उत्पादनाची अपेक्षा आहे.

कृषी विभागाचे आवाहन अन् शेतकऱ्यांचा प्रतिसाद

खरीप हंगामातील नुकसानीनंतर शेतकरी पीक पध्दतीमध्ये बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते. मात्र, बदललेले वातावरण आणि पेरणीसाठी होत असलेला उशिर यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्यावरच भर द्यावा अशा प्रकारची जनजागृती केली जात होती. याकरिता अधिकचा खर्च असतानाही शेतकऱ्यांनी तो बदल स्वीकारला म्हणूनच कडधान्यामध्ये वाढ झाली आहे. विशेषत: हरभरा क्षेत्रात दुपटीने वाढ झाली असून हेच पीक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणार असल्याचा विश्वास जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: आता उरले दोनच दिवस, ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करा अन्यथा नुकसानभरपाईला मुकावे लागणार

शेतकऱ्यांची मंदीत-संधी, जे मुख्य पिकांतून मिळाले नाही ते हंगामी पिकांतून पदरी पडणार का?

State Government: आता एकाच छताखाली शेतकऱ्यांना मिळणार सर्व रोपे, काय आहे राज्य सरकारचा प्लॅन?