Mahindra Bolero Neo ची लवकरच बाजारात एंट्री, जाणून घ्या ढासू SUV ची किंमत आणि फीचर्स

| Updated on: Jul 05, 2021 | 3:48 PM

महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) कंपनी लवकरच भारतात महिंद्रा बोलेरो ही कार नव्या अवतारात सादर करणार आहे.

Mahindra Bolero Neo ची लवकरच बाजारात एंट्री, जाणून घ्या ढासू SUV ची किंमत आणि फीचर्स
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) कंपनी लवकरच भारतात महिंद्रा बोलेरो ही कार नव्या अवतारात सादर करणार आहे. कंपनी लवकरच आपले स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) महिंद्रा बोलेरो निओ (Mahindra Bolero Nio) सादर करू शकते. बोलेरोचा हा नवीन अवतार कंपनीच्या सध्याच्या मॉडेल टीयूव्ही 300 (TUV300) कारवर आधारित असेल आणि लवकरच ही कार बाजारात लाँच होऊ शकते. (2021 Mahindra Bolero Neo is ready to launch in India, check price and features)

सूत्रांवर विश्वास ठेवायचा तर कंपनीने या एसयूव्हीमध्ये बरेच बदल केले आहेत. सध्याच्या टीयूव्ही 300 च्या तुलनेत कंपनीने नवीन बोलेरो निओच्या फ्रंटमध्ये बरेच बदल केले आहेत. यासाठी यामध्ये री-प्रोफाइल्ड हायलाइट्स, अपडेटेड ग्रिल, नवीन फ्रंट बंपर्स आणि एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत. नवीन बोलेरो निओला काही क्लासिक बोलेरो डिझाइन्स जसे की क्लॅम-शेल बोनेट यांसह, काही किरकोळ बदलांशिवाय रियरमध्ये फारसे बदल केले नाहीत.

2021 Mahindra Bolero Neo चं इंजिन

महिंद्रा बोलेरो निओच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये टीयूव्ही 300 सारखे बीएस 6 कम्पलायंट 1.5 लीटर थ्री सिलेंडर इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 100 एचपी पॉवर आणि 240Nm टॉर्क जनरेट करेल. यासोबतच या इंजिनमध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध असेल. याशिवाय या एसयूव्हीमध्ये फ्यूल-सेव्हिंग, इंजिन स्टार्ट-स्टॉप फीचर दिले जाऊ शकते, जे यापूर्वी टीयूव्ही 300 मध्ये देण्यात आले होते.

2021 Mahindra Bolero Neo ची किंमत

या एसयूव्हीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 2021 महिंद्रा बोलेरो निओची किंमत त्याच्या स्टँडर्ड मॉडेलपेक्षा थोडी जास्त असू शकते. या एसयूव्हीची किंमत 9 ते 12 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असू शकते. निओच्या माध्यमातून कंपनी अशा ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यांना नियमित बोलेरोपेक्षा अधिक कम्फर्ट हवा आहे. यासह महिंद्रा असादेखील विचार करीत आहे की, निओचे (Neo) नवीन ‘बोलेरो’ (Bolero) नेमप्लेट ग्राहकांना या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये अधिक रस दर्शविण्यास मदत करेल.

महिंद्रा 9 नवी वाहनं लाँच करणार

दरम्यान, महिंद्राने पुष्टी केली आहे की, कंपनी न्यू जनरेशन थारचं (Mahindra Thar) 5-डोर व्हेरिएंट लाँच करणार आहे. तसेच महिंद्राने जाहीर केलं आहे की, कंपनी 2026 पर्यंत नऊ नवीन उत्पादने लाँच करणार आहे आणि 5-डोर थार हे त्यापैकीच एक उत्पादन असेल. 5-डोर थारच्या लाँचिंगची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु कंपनीने याची पुष्टी केली आहे की नवीन महिंद्रा थार 5-डोर मॉडेल 2023 आणि 2026 च्या दरम्यान लाँच केलं जाईल. या काळात कंपनी न्यू जनरेशन महिंद्रा बोलेरो, बॉर्न ईव्ही प्लॅटफॉर्मवर बेस्ड काही इलेक्ट्रिक वाहनं, न्यू जनरेशन एक्सयूव्ही 300 आणि दोन नवीन मॉडेल्स लाँच करु शकतं. W620 आणि V201 अशी या दोन मॉडेल्सची नावं आहेत.

इतर बातम्या

लाट असो की लॉकडाऊन, महिंद्रा सुसाट, एका महिन्यात विक्रमी ट्रॅक्टर्सची विक्री

खूशखबर ! आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे झाले सोपे, जाणून घ्या काय आहे नवीन नियम

जर्मन कारमेकर Volkswagen ची Polo GTI Facelift सादर, जाणून घ्या खास फीचर्स

(2021 Mahindra Bolero Neo is ready to launch in India, check price and features)