जर्मन कारमेकर Volkswagen ची Polo GTI Facelift सादर, जाणून घ्या खास फीचर्स

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jul 02, 2021 | 3:49 PM

जर्मन वाहन निर्माता कंपनी फॉक्सवॅगनने (Volkswagen) भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या पोलो जीटीआय 2021 (Polo GTI 2021) कारचा लुक सादर केला आहे

जर्मन कारमेकर Volkswagen ची Polo GTI Facelift सादर, जाणून घ्या खास फीचर्स
Polo-GTI
Follow us

मुंबई : जर्मन वाहन निर्माता कंपनी फॉक्सवॅगनने (Volkswagen) भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या पोलो जीटीआय 2021 (Polo GTI 2021) कारचा लुक सादर केला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीस कंपनीने sixth-gen Polo facelift चे अनावरण केले होते. पोलो जीटीआय बद्दल असे म्हटले जात आहे की, टेक्नोलॉजीचा विचार केला तर ही कार Eightth Gen. Golf वर आधारीत आहे. नवीन मॉडेलमध्ये कॉस्मेटिक बदल पाहायला मिळतील, तसेच अनेक अपडेटेड फीचर्स देण्यात आले आहेत. (Volkswagen revealed Polo GTI Facelift 2021, will launch in India, check features)

Polo GTI 2021 एक हॅचबॅक कार असेल, ज्याच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच कंपनीने या कारच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा केल्या आहेत. या कारच्या फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, यामध्ये 204hp टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असेल आणि त्याला 7-स्पीड डुअल क्लच गीअरबॉक्स देण्यात आला आहे. त्याच्या एक्सटीरियर लुकवर अधिक लक्ष केंद्रित केले गेले आहे. यामध्ये एलईडी मॅट्रिक्स (LED matrix) हेडलाइट बसवण्यात आल्या आहेत. तसेच रेडिएटर ग्रिलला क्रॉसबार डिझाइन मिळेल.

डायनॅमिक टर्न सिग्नल मिळणार

कारमध्ये 17-इंचांचे टू-टोन अलॉय व्हील्स मिळतील. ब्रेकर सिस्टम सुधारित केली आहे आणि त्यामध्ये रेड क्लिपर्स वापरल्या गेल्या आहेत. त्यात डायनॅमिक टर्न सिग्नलचे अतिरिक्त फीचर असेल. ब्रेक लाइट्स GTI मध्ये अ‍ॅनिमेटेड रुपात आहेत.

डिजिटल कॉकपिट डॅशबोर्ड सेटअप

गोल्फप्रमाणेच पोलो जीटीआयला नवीन डिजिटल कॉकपिट डॅशबोर्ड सेटअप मिळतो. सध्या, इंटिरियर स्पेसिफिकेशनबद्दल फारशी माहिती नाही, परंतु असा विश्वास व्यक्त केला जात आहे की, त्याची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम 9.2 इंचांची असेल. पॅनोरमा सनरूफ, क्लायमेट कंट्रोल, बीट्स साऊंड सिस्टम, व्हॉइस कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असे फीचर्स या कारमध्ये असू शकतात.

इंजिन स्पेसिफिकेशन्स

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर पोलो जीटीआय मध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळेल, जे 204 बीएचपी उर्जा प्रदान करेल, तसेच 320 न्यूटन मीटर मॅक्सिमम टॉर्क तयार करू शकतं. कारमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड असतील. आपण आपल्या आवडीनुसार ड्रायव्हिंग मोड निवडू शकता.

इतर बातम्या

उद्यापासून तुमच्या आवडत्या गाड्या होणार महाग; मारुतीपासून हिरोपर्यंत कंपन्यांनी घेतला दरवाढीचा निर्णय

टाटा मोटर्स बनवणार 15 हायड्रोजन आधारीत इंधन सेल बस, आयओसीएलचे आदेश

(Volkswagen revealed Polo GTI Facelift 2021, will launch in India, check features)

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI