कोरोना काळातही ‘या’ कंपनीकडून 36000 रुपयांची ऑफर, स्वस्तात खरेदी करा बेस्ट फॅमिली कार

| Updated on: May 15, 2021 | 6:55 PM

मारुती सुझुकीने ग्राहकांसाठी उत्तम ऑफर सादर केल्या आहेत. कंपनी मारुती सुझुकी अल्टोवर (Maruti Suzuki Alto) सवलत देत आहे.

कोरोना काळातही या कंपनीकडून 36000 रुपयांची ऑफर, स्वस्तात खरेदी करा बेस्ट फॅमिली कार
Maruti Suzuki Cars
Follow us on

मुंबई : कोरोना साथीच्या आजारामुळे बर्‍याच लोकांनी स्वत: च्या मोटारींमधून प्रवास करण्यास सुरवात केली आहे. त्याच वेळी, बरेच लोक असे आहेत जे सध्या सेकंड हँड कारच्या शोधात आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा अल्प कालावधी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन अनेकांनी नवीन वाहन खरेदी केलं आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, 3 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्हाला एक उत्तम कार मिळू शकते आणि तीही सवलतीच्या दरात. (36,000 Rs discount on Maruti Suzuki Alto, check details of offer)

मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनीने ग्राहकांसाठी उत्तम ऑफर सादर केल्या आहेत. कंपनी मारुती सुझुकी अल्टोवर (Maruti Suzuki Alto) सवलत देत आहे. ग्राहक या कारवर 36,000 रुपयांची मोठी बचत करू शकतात. या गाडीच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, याचं पेट्रोल व्हेरियंट 22.05 किमी प्रति लीटरचं मायलेज देते, तर सीएनजीमध्ये तुम्हाला 31.59 किमी प्रति किलो इतकं मायलेज मिळतं. ऑल्टोवर मिळणाऱ्या डिस्काऊंटबद्दल बोलायचे झाल्यास यावर तुम्हाला 17,000 रुपयांची रोख सूट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काऊंट मिळेल.

मारुतीची ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. याशिवाय वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या डीलरशिपवर तुम्हाला या ऑफरबद्दल माहिती मिळू शकते. कारण वेगवेगळ्या राज्यांमध्ये, शहरांमध्ये वाहनांच्या किंमतीत थोडाफार फरक आहे. त्यामुळे कार घेताना तपासून घ्या.

किंमत

या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास दिल्लीत या कारची एक्स शो रूम किंमत 2,99,800 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर या कारच्या टॉप एंड व्हेरिएंटची किंमत 4,48,200 रुपये इतकी आहे. या कारच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला BS6 कम्प्लायंट 796 सीसी, 3 सिलेंडर, 12 व्हॉल्व्ह इंजिन मिळते. हे इंजिन 6000rpm वर 48PS मॅक्सिमम पॉवर आणि 3500rpm वर 69Nm चा टॉर्क देतं. ऑल्टोमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.

इतर बातम्या

दुरुस्ती आणि मेंटेनन्सचे अधिकचे पैसे विसरा, MG Motors चं ग्राहकांना गिफ्ट, फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

अवघ्या तीन महिन्यात एलन मस्कची पलटी, Tesla कंपनी Bitcoin मध्ये पेमेंट स्वीकारणार नाही, कारण…

सिंगल चार्जवर तब्बल 800 किमी धावणार, 3 सेकंदात 100 किमी वेग, MG ची इलेक्ट्रिक कार बाजारात

(36,000 Rs discount on Maruti Suzuki Alto, check details of offer)