दुरुस्ती आणि मेंटेनन्सचे अधिकचे पैसे विसरा, MG Motors चं ग्राहकांना गिफ्ट, फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने बुधवारी घोषणा केली की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत.

दुरुस्ती आणि मेंटेनन्सचे अधिकचे पैसे विसरा, MG Motors चं ग्राहकांना गिफ्ट, फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली
MG Motors
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 11:13 PM

मुंबई : एमजी मोटर इंडिया (MG Motor India) कंपनीने बुधवारी घोषणा केली की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे, याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी 15 मार्च 2021 ते 31 मे 2021 दरम्यान संपणार आहे. ती मुदत आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच MG Motors ने वॉरंटी पीरियड एक्सटेंशन आणि शेड्यूल मेंटेनन्स तसेच फ्री सर्व्हिसिंगची सुविधा सर्व गाड्यांवर देऊ केली आहे. ज्यामध्ये Hector, Hector Plus, ZS EV आणि Gloster सह सर्व गाड्यांचा समावेश आहे. (MG Motor India extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)

कंपनीने अशा वेळी ही घोषणा केली आहे, जेव्हा ग्राहकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. कुठे लॉकडाऊन, कुठे संचारबंदी तर कुठे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपनीचा हा निर्णय ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.

Tata Motors चं ग्राहकांना जबरदस्त गिफ्ट

टाटा मोटर्सने (Tata Motors) जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

टाटा मोटर्सच्या कस्टमर केअर हेड डिंपल मेहता यांनी जाहीर केले की, कोरोना साथीच्या आजारामुळे लोकांचं घराबाहेर पडणं बंद झालं आहे. अशा परिस्थितीत सध्या कोणताही ग्राहक त्यांच्या कारच्या सर्व्हिस आणि दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरला जाऊ शकत नाही. अशा परिस्थिती ज्या ग्राहकांची सर्व्हिस आणि वॉरंटी अद्याप प्रलंबित आहे अशा ग्राहकांसमोर आव्हान उभे आहे.

Maruti ने फ्री सर्व्हिसिंग, वॉरंटी वाढवली

मारुती सुझुकीने बुधवारी जाहीर केले की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची विनामूल्य सर्व्हिसिंग आणि वॉरंटी वाढवित आहेत. देशातील कोरोनाची स्थिती आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीने प्रत्येक ग्राहकासाठी ही विनामूल्य सेवा वैध केली आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी किंवा फ्री सर्व्हिसिंगची मुदत 15 मार्च ते 31 मे दरम्यान कालबाह्य होणार आहे. ती मुदत आता 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संचालक पार्थो बॅनर्जी म्हणाले आहेत की, आम्ही ग्राहकांच्या सोयीसाठी ही घोषणा केली आहे. आम्ही वाहनांची विनामूल्य सर्व्हिस, वॉरंटी आणि एक्सटेंडेड वॉरंटी 30 जून पर्यंत वाढविली आहे. दरम्यान, मारुतीसह इतर अनेक कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

महिंद्रानेही वाहनांची वॉरंटी वाढवली

महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) कंपनीने जाहीर केले आहे की, ते आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं आहे, याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी 1 एप्रिल 2021 ते 31 मे 2021 दरम्यान संपणार आहे. ती मुदत आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच महिंद्राने वॉरंटी पीरियड एक्सटेंशन आणि शेड्यूल मेंटेनन्स तसेच फ्री सर्व्हिसिंगची सुविधा सर्व गाड्यांवर देऊ केली आहे. ज्यामध्ये Thar SUV, Bolero, Scorpio, XUV300 या गाड्यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Citroen ची छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा जलवा, लाँचिंगपूर्वीच 7000 गाड्यांची विक्री

(MG Motor India extends free service and warranty of their vehicles due to covid 19 lockdown)

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.