AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुतीन यांची सर्वात मोठी घोषणा, मोजतबा यांची नियुक्ती होताच खळबळजनक निर्णय; अमेरिकेची झोप उडाली!

इराणने अयातुल्ला खामेनेई यांचे द्वितीय पुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे देशाचे नेतृत्त्व सोपवले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पुतीन यांची सर्वात मोठी घोषणा, मोजतबा यांची नियुक्ती होताच खळबळजनक निर्णय; अमेरिकेची झोप उडाली!
vladimir putin and mojtaba khameneiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 09, 2026 | 9:31 PM
Share

इराण-इस्रायल युद्ध अजूनही संपलेले नाही. या युद्धात रोज अनेकांचा बळी जातोय. इराणमधील परिस्थिती तर खूपच बिकट आहे. तेथील सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या हत्येनंतर भविष्यात या देशाचे नेतृत्त्व कोणाकडे असेल? याची संंपूर्ण जगाला उत्सुकता लागली होती. असे असतानाच आता इराणने अयातुल्लाह अली खामेनेई यांचे द्वितीय पुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे देशाचे नेतृत्त्व सोपवले आहे. परंतु अमेरिकेने मात्र मोजतबा यांच्या नेतृत्त्वाला विरोध केलेला आहे. आमच्या मर्जीच्या विरोधातील माणूस सर्वोच्च स्थानावर असेल तर आम्ही त्याचाही खात्मा करू, असा इशारा अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे. असे असतानाच आता रशियाने संपूर्ण जगाची झोप उडवणारी भूमिका घेतली आहे. त्यांनी आम्हाला मोजतबा यांचे नेतृत्व मान्य असल्याचे सांगितले असल्याने अमेरिकेचे टेन्शन वाढले आहे.

पुतीन यांनी नेमकी काय भूमिका घेतली?

व्लादिमीर पुतीन यांनी अयातुल्ला मोजतबा खामेनेई यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. “रशिया हा इराणचा विश्वासू सहकारी राहिलेला आहे. सध्या इराण सध्या मोठ्या शस्त्रांच्या हल्ल्यांचा समना करत आहे. अशा स्थितीत सर्वोच्च पद सांभाळण्यासाठी खूप हिंमत लागते. मी इराणला पूर्ण पाठिंबा देतो,” असे पुतीन म्हणाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जातोय विरोध

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र मोजतबा यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी याआधीच अयातुल्ला खामेनेई यांचा मुलगा मला इराणच्या सर्वोच्च पदावर बसलेला नको आहे. माझा याला विरोध आहे. इराणमध्ये शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करणारा नेता मला हवा आहे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केलेले आहे. मोजतबा यांना आमचा पाठिंबा नसेल तर ते फार काळ या पदावर राहणे शक्य नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

भविष्यात नेमकं काय घडणार?

दरम्यान, मोजतबा यांच्या नियुक्तीला अमेरिकेने विरोध केल्यामुळे नेमकं काय होणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे रशियाने मोजतबा यांच्या नियुक्तीचे स्वागत केल्याने भविष्यात युद्ध चिघळलेच तर पुतीन नेमके कोणाच्या बाजूने असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना