AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चालत्या कारमध्ये उभे राहण्यासाठी नसते सनरूफ, असा करायचा असतो वापर

सनरूफ असलेल्या कारमध्ये उभे राहून मजा लूटताना तुम्ही अनेकांना पाहिले असेल. लहान तर लहान मोठेही यात मागे नाही. मात्र हे किती धोक्याचे आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल.

चालत्या कारमध्ये उभे राहण्यासाठी नसते सनरूफ, असा करायचा असतो वापर
सनरूफImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 18, 2023 | 8:45 PM
Share

मुंबई : सनरूफ हे आजकाल कारमध्ये अतिशय लोकप्रिय वैशिष्ट्य बनले आहे. त्यामुळे कार अधिक स्टायलिश दिसते. पण, काही लोकं सनरूफचा गैरवापर करतात. वास्तविक, त्यांनी सनरूफचा वापर कसा करायचा हेही माहिती नसते. अनेकजण सनरूफमधे (Sunroof Use) उभे राहून मजा घेतात, जे धोकादायक ठरू शकते. कारमध्ये सनरूफचा योग्य वापर काय आहे आणि कंपनीने हे फिचर कशासाठी दिले आहे ते जाणून घेऊया.

कारमध्ये सनरूफचा योग्य वापर?

  • सनरूफ असण्याचा पहिला फायदा म्हणजे तो कारच्या आत अधिक नैसर्गिक प्रकाश देतो. नैसर्गिक प्रकाशाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जसे की मूड सुधारणे आणि ऊर्जा पातळी राखणे.
  •  सनरूफ उघडून तुम्ही कारमध्ये ताजी हवा आत घेऊ शकता. सनरूफच्या मदतीने कार लवकर थंड करता येते. विशेषतः उन्हाळ्यात, सनरूफ उघडून, आतली गरम हवा बाहेर काढून कार केबिन थंड करू शकता.
  • कारमध्ये सनरूफ असल्यास तुम्हाला एक ओपन फील येतो. यामुळे तुम्हाला कारच्या केबिनमध्ये अधिक प्रशस्त वाटते. सनरूफ उघडल्याने कारचे वेंटिलेशन सुधारते.
  • सनरूफ कारला अधिक स्टायलिश बनवते. हे कारला अधिक आकर्षक आणि स्पोर्टी लुक देते. त्यामुळे आजकाल याला खूप मागणी आहे.

ही चूक कधीही करू नका

अनेकदा तुम्ही लहान मुलांना किंवा मोठ्यांना सनरूफमधून बाहेर पडून मजा करताना पाहिलं असेल, जे चुकीचं आहे. असे करू नये कारण अशी मजा धोकादायक ठरू शकते. मुलांनी कितीही आग्रह केला तरी त्यांना सनरूफमधून बाहेर पडू देऊ नका कारण हार्ड ब्रेकिंग करताना सनरूफमधून बाहेर पडणारी व्यक्तीही गाडीतून पडू शकते. असा अपघात जीवघेणाही ठरू शकतो.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी