
मुंबई : रणबीर कपूरकडे (Ranbir kapoor) आलिशान गाड्यांचा मोठा संग्रह आहे. अभिनेत्याकडे रेंज रोव्हर वेलार (Range Rover Velar) देखील आहे. या कारमध्ये रणबीर अनेकदा बसलेला दिसला आहे. रेंज रोव्हरची ही एसयूव्ही तुम्हीही खरेदी करू शकता. विश व्हील्स इंडिया नावाच्या कार डीलरशिपने इंस्टाग्रामवर रेंज रोव्हर वेलारची जाहिरात पोस्ट केली आहे. हे मॉडेल 2018 सालचे आहे.
Velar SUV चे डिझाईन, ॲडव्हान्स इन्फोटेनमेंट युनिट आणि उत्कृष्ट ऑफ-रोडिंग कौशल्य यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी आहे. तुम्हाला अशी टॉप परफॉर्मन्स कार घ्यायची असेल तर तुम्ही डीलरशी बोलू शकता. या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे – आता तुम्हालाही स्टारप्रमाणे कार चालवण्याची संधी आहे. जाणून घ्या त्याचे काही तपशील…
सेकंड हँड रेंज रोव्हर वेलारचे डिटेल्स
नोट : ही कार रणबीरची आहे, हा आमचा दावा नाही. डीलरशिपच्या सांगण्यानुसार हे 2018 चे मॉडेल आहे जे रणबीरकडे होते. तुम्हाला ही कार घेण्यास स्वारस्य असल्यास, त्याबद्दल पुरेस तपास व संशोधन केल्यानंतरच पुढे जा.