मारुतीनंतर ‘ही’ कंपनी ठरली देशातील सर्वात मोठी कार विक्रेता… टाटालाही दिली टक्कर

| Updated on: Sep 07, 2022 | 2:16 PM

दक्षिण कोरियातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रमुख ह्युंदाईने आपल्या सप्लाय चेनमधील अडचणी दूर केल्यामुळे यावर्षी भारतीय बाजारपेठेत कार सेलिंगमध्ये सर्वोच्च आकडे गाठण्याची व्यक्त होत आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीने मारुतीनंतर सर्वाधिक गाड्या विकल्या आहेत.

मारुतीनंतर ‘ही’ कंपनी ठरली देशातील सर्वात मोठी कार विक्रेता… टाटालाही दिली टक्कर
Follow us on

मारुतीनंतर (Maruti) आता ह्युंदाई (Hyundai) सर्वाधिक कार विक्रेता कंपनी ठरण्याच्या मार्गावर आहे. त्याच सोबत कंपनी आता टाटाला (Tata Motors) देखील टक्कर देत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ह्युंदाईने सर्वाधिक कार विक्री केल्या आहेत. दक्षिण कोरियातील ऑटोप्रमुख असलेल्या ह्युंदाईने आपल्या सप्लाय चेनमधील मुख्य अडचणी दूर करुन हे यश गाठले आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीने मारुतीनंतर सर्वाधिक गाड्या विक्री केल्या आहेत. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे संचालक तरुण गर्ग यांनी पीटीआयशी संवाद साधताना ही शक्यता व्यक्त केली असून ते म्हणाले की, सेमीकंडक्टर सप्लाय चेनमध्ये सुधारणा झाल्यामुळे वाहनांची विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. याशिवाय येत्या सणासुदीचा हंगामात मागणी वाढण्याचीही कंपनीला अपेक्षा आहे. गर्ग म्हणाले, सेमीकंडक्टरची स्थिती आता चांगली होत आहे आणि मागणीतही ताकद वाढण्याचा ट्रेंड सुरू आहे.

किती वाहनांची झाली विक्री?

2018 मध्ये ह्युंदाईची भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक 5.5 लाख वाहनांची विक्री होती. कंपनीने ऑगस्ट महिन्यात 49,510 वाहनांची घाऊक विक्री केली जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय कंपनीच्या विविध मॉडेल्सच्या पेडिंग ऑर्डर्सची संख्याही 1.3 लाखांपर्यंत वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

व्हेन्यू एन लाइन लॉन्च

ह्युंदाईने त्याच्या मीड साईजच्या एसयुव्ही व्हेन्यूचे N Line व्हेरिएंट लाँच करून एसयुव्ही सेगमेंटमध्ये आपला झेंडा रोवला आहे. ह्युंदाई सध्या एसयुव्ही सेगमेंटमध्ये Venue, Creta, Alcazar, Tusson आणि Kona इलेक्ट्रिक मॉडेल्सची विक्री करत आहे. गर्ग म्हणाले, की एकूण विक्रीत एसयुव्ही सेगमेंटचा वाटा सातत्याने वाढत आहे आणि इतर वाहन कंपन्यांच्या तुलनेत ह्युंदाईची स्थिती खूपच चांगली आहे. ते म्हणाले, ह्युंदाईच्या देशांतर्गत विक्रीत एसयुव्हीचा वाटा 53 टक्के आहे तर उद्योगाचा सरासरी वाटा फक्त 41 टक्के आहे. उत्पादनाचा वेग वाढवून कंपनी लवकरात लवकर ग्राहकांना पुरवठा करू शकेल अशी आशा गर्ग यांनी व्यक्त केली आहे.