सर्वात स्वस्त कार, 28 किमी मायलेज अन् किंमत फक्त 4.76 लाख रुपये, खरेदीसाठी उडाली झुंबड

दिवाळीमध्ये 4.76 लाख रुपयांमध्ये घरी आणा ही नवीन कार. मिळतायत 35 हजार रुपयांपर्यंत फायदे. 28 किमी मायलेज अन् फीचर्स देखील खूपच जबरदस्त. कोणती आहे ही कार?

सर्वात स्वस्त कार, 28 किमी मायलेज अन् किंमत फक्त 4.76 लाख रुपये, खरेदीसाठी उडाली झुंबड
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 03, 2026 | 3:45 PM

दिवाळीच्या सणात कमी बजेटमध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय एंट्री-लेव्हल हॅचबॅक टाटा टियागोवर नोव्हेंबर 2026 मध्ये 35 हजार रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. विशेष म्हणजे, ही सवलत पेट्रोल आणि CNG या दोन्ही प्रकारांतील निवडक व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. टियागोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.76 लाख रुपये आहे. त्यामुळे कमी बजेटमध्ये कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही चांगली संधी ठरू शकते.

टाटा मोटर्सच्या ऑफरनुसार, टियागोच्या XE व्हेरिएंटला वगळून इतर निवडक पेट्रोल आणि CNG व्हेरिएंटवर 35 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. यामध्ये 15 हजार रुपयांचा कन्झ्युमर डिस्काउंट, 5 हजार रुपयांचा इंटरव्हेन्शन बेनिफिट आणि 15 हजार रुपयांपर्यंतचा स्क्रॅपेज इन्सेंटिव्ह समाविष्ट आहे.

Loading...

टियागोच्या डिझाइनमध्ये बदल

2026 टाटा टियागोमध्ये आकर्षक डिझाइन अपडेट्स देण्यात आले आहेत. कारच्या पुढील भागात अधिक शार्प हेडलॅम्प्स, नवीन ग्रिल आणि नव्याने डिझाइन केलेला बंपर मिळतो. याशिवाय 170 मिमी ग्राउंड क्लिअरन्स, नवीन 15-इंच अलॉय व्हील्स आणि व्हील आर्चवर ब्लॅक क्लॅडिंग देण्यात आली आहे.

कारच्या मागील बाजूस कनेक्टेड टेललॅम्प सेटअप आणि नवीन रूफ स्पॉयलर देण्यात आला आहे. ही कार डेटोना ग्रे, पॅंगॉन्ग पल्स, प्रिस्टीन व्हाइट, प्युअर ग्रे, सोबो सर्ज आणि वाराणसी व्हायब्रन्स अशा सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे.

आधुनिक फीचर्स आणि सेफ्टी

टाटा टियागोच्या केबिनमध्येही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यात 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि दोन वायरलेस चार्जिंग पॅड्स देण्यात आले आहेत.

याशिवाय मागील प्रवाशांसाठी एसी व्हेंट्स, 4-स्पीकर साउंड सिस्टम, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, क्रूझ कंट्रोल, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि वायरलेस अ‍ॅपल कारप्ले व अँड्रॉइड ऑटो यांसारखी फीचर्स मिळतात.

सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट अँकर आणि ABS सोबत EBD यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

किंमत आणि डिस्काउंट

टाटा टियागोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.76 लाख रुपये आहे. पेट्रोल आणि CNG व्हेरिएंटवर मिळणाऱ्या 35 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफरमुळे ग्राहकांना कार खरेदी करताना चांगली बचत करता येऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us