काटे की टक्कर… आता MG लाँच करणार सर्वात बजेट इलेक्ट्रिक कार…

| Updated on: Jun 30, 2022 | 2:58 PM

Wuling Air EV कारला भारतीय बाजारामध्ये चार सीट व्हर्जनमध्येही सादर केले जाउ शकते. यात, एका परिवारातील चार किंवा पाच लोक बसू शकणार आहेत. सोबत या कारचा जास्त वापर देखील करता येतो. रिपोर्टनुसार, टेस्टिंग मॉडेलमध्ये चार सीट असलेले पर्याय दिसून येत आहेत. या कारमध्ये एक्स्ट्रा व्हीलला मागच्या बाजूने माउंट केले गेले असून असे साधारणत: एसयुव्ही आदी सेगमेंटच्या गाड्यांमध्ये दिसून येत असते

काटे की टक्कर... आता MG लाँच करणार सर्वात बजेट इलेक्ट्रिक कार...
Image Credit source: Social media
Follow us on

भारतीय कार बाजारात इलेक्ट्रिक कारच्या (Electric car) सेगमेंटमध्ये बेस्ट सेलिंग कार ब्रँड टाटा मोटर्स आहे. तर दुसर्या नंबरवर एमजी मोटर्स (MG Motors) आपल्या जागी कायम आहे. आता एमजी मोटर्स भारतीयांसाठी एक न्यू ईव्ही कार तयार करत असल्याची माहिती आहे. ही एक हेचबेक सेगमेंटची कार असणार आहे. यात, 2023 च्या ऑटो एक्सपोच्या दरम्यान शोकेज केले जाउ शकते, अशी माहिती आहे. या बाबतची माहिती गाडीवाडी नावाच्या वेबसाइटने शेअर केली आहे. नवीन रिपोर्टनुसार, एमजीने या अपकमिंग कारची रोड टेस्टिंगदेखील सुरु केली आहे. ही कंपनी एंट्री लेव्हल ईव्ही (Entry Level EV) ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  1. एमजी मोटर्सची अपकमिंग हॅचबॅक ईव्ही कारचे फोटो इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून असे सांगण्यात येत आहे, की भारतामध्ये या कारची रोड टेस्टिंग देखील सुरु झाली आहे. एका माहितीनुसार, एमजीची ही हॅचबॅक कार चीन आणि इंडोनेशियामध्ये लाँच झालेल्या Wuling Air EV वर आधारीत आहेत. भारतामध्ये लाँच होत असलेल्या एमजी ईव्हीबाबत अद्याप कोणत्याही स्पेसिफिकेशन्स बाबतचा खुलासा झालेला नाही. परंतु चीन आणि इंडोनेशियामध्ये दाखल झालेल्या Wuling Air EV बाबत अधिकृत माहिती उपलब्ध आहे.
  2. Wuling Air EV ची लांबी 2974 एमएम इतकी आहे. आणि चौडाई 1505 एमएम इतकी आहे. या कारची उंची 1631 एमएम इतकी आहे. या शिवाय या कारमध्ये 2010 एमएम व्हील बेस देखील उपलब्ध आहेत. ही एक तीन डोर हॅचबॅक कार आहे. ही टू सीटर आणि फोर सीटर ऑप्शनमध्येही दाखल झालेली आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. Wuling Air EV कारला भारतीय बाजारामध्ये चार सीट व्हर्जनमध्येही सादर केले जाउ शकते. यात, एका परिवारातील चार किंवा पाच लोक बसू शकणार आहेत. सोबत या कारचा जास्त वापर देखील करता येतो. रिपोर्टनुसार, टेस्टिंग मॉडेलमध्ये चार सीट असलेले पर्याय दिसून येत आहेत. या कारमध्ये एक्स्ट्रा व्हीलला मागच्या बाजूने माउंट केले गेले असून असे साधारणत: एसयुव्ही आदी सेगमेंटच्या गाड्यांमध्ये दिसून येत असते. चीन आणि इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आलेल्या व्हर्जनमध्ये हे फीचर देण्यात आलेले नाही. कारचे शार्प डिझाईन आणि इतर फीचर्स दिसू नये म्हणून रोड टेस्टिंगच्या दरम्यान, एमजीची ही कार एक पेपरने कव्हर करण्यात आली होती.