दिवाळीत कार घेण्याचा विचार करताय? मग 5.75 लाखात घरी आणा ही कार, देते 27 किमी मायलेज
दिवाळीमध्ये तुम्ही देखील कार घेण्याचा विचार करत असाल तर 10 लाखांच्या आत मिळतायत सर्वात स्वस्त आणि जबरदस्त फीचर्स असणाऱ्या कार. मायलेज आणि फीचर्सही जबरदस्त.

दिवाळी 2026 च्या सणात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल तर भारतीय बाजारात तुमच्यासाठी अनेक शानदार SUV उपलब्ध आहेत.
मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हुंडई, रेनॉ आणि निसान यांसारख्या कंपन्यांच्या पेट्रोल SUV कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स, दमदार इंजिन आणि उत्तम मायलेज देतात. विशेष म्हणजे, या गाड्या रोजच्या वापरासाठीही उपयुक्त ठरतात.
Tata Punch- 10 लाख रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये टाटा पंच हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. या मायक्रो SUV मध्ये 1.2-लिटर नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय आहेत. याशिवाय CNG व्हेरिएंटही उपलब्ध आहे. या कारची किंमत 5.75 लाख रुपयांपासून सुरु होते. कंपनीच्या दाव्यानुसार, कारचे मायलेज 26.99 किमीपर्यंत आहे.
Hyundai Exter- हुंडई एक्स्टर हीदेखील कमी बजेटमध्ये कॉम्पॅक्ट SUV खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. या कारची किंमत 5.81 लाख रुपयांपासून सुरु होते. यात 1.2-लिटर कप्पा पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 82hp पॉवर आणि 113.8Nm टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात. कंपनीच्या माहितीनुसार, ही SUV 27.1 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते.
Renault Kiger- रेनॉ काइगर ही स्टायलिश डिझाइन आणि प्रशस्त केबिनसाठी ओळखली जाणारी कॉम्पॅक्ट SUV आहे. यात 1.0-लिटर नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळते, जे 71hp पॉवर निर्माण करते. याशिवाय अधिक पॉवर हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी 99hp क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिनही उपलब्ध आहे. कमी बजेटमध्ये SUV खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी काइगरचे नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल व्हेरिएंट विचार करण्यासारखे आहे.
Maruti Suzuki Fronx- मारुती सुझुकी फ्रॉन्क्स हीदेखील दिवाळीत SUV खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक निवड ठरू शकते. यात 1.2-लिटर नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 88hp पॉवर आणि 113Nm टॉर्क निर्माण करते. या कारची किंमत 6.90 लाख रुपयांपासून सुरु होते. फीचर्समध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश आहे.
टीप: लेखातील सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. प्रत्यक्ष किंमत शहर, व्हेरिएंट आणि डीलरशिपनुसार बदलू शकते. तसेच मायलेजचे आकडे कंपनीच्या दाव्यांनुसार असून प्रत्यक्ष वापरात त्यात फरक पडू शकतो.