
नवी दिल्ली : मिडल क्लास फॅमिलीसाठी कार विकत घेण मोठी गोष्ट असते. काहीवेळा लोक कार विकत घेण्याच्या आनंदात डिलीवरी घेताना बारकावे समजून घेत नाहीत. कारची डिलीवरी घेताना केलेल्या छोटाशा चुकीमुळे तुमच मोठ नुकसान होऊ शकतं. त्याशिवाय कार खरेदीसाठी उत्तम महिना कुठला?. त्याच उत्तर आहे डिसेंबर. हाच महिना कार खरेदीसाठी उत्तम मानला जातो. या महिन्यात कारची डिलीवरी आरामात मिळते. नव्या वर्षात अनेक कार्सच फेसलिफ्ट मॉडल लॉन्च होणार असतात. त्यामुळे विद्यमान कारच्या म़ॉडल्सवर चांगल डिस्काऊंट सुद्धा मिळतं. तुम्ही डिसेंबर महिन्यात कार बुक केली आहे आणि लवकरच डिलीवरी घेणार असाल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. काही चूका टाळाव्या लागतील.
नव्या कारची डिलीवरी घेण्याआधी या 5 गोष्टी तपासून घ्या
1 कारच्या बॉडीवर काही स्क्रॅच, तडा गेल्याचे निशाण नाहीयना. काही डॅमेज नाहीय ना हे तपासा. सर्व विंडो आणि दरवाजे तपासून घ्या.
2 कारचे सीट, डॅशबोर्ड आणि इंटरनल पार्ट्सवर काही आरेखडे नाहीयत ना. कुठल नुकसान झालेलं नाहीय ना. सर्व पार्ट्स आणि फिचर्स व्यवस्थित काम करतायत ना हे तपासून घ्या.
3 कारच इंजिन साफ आणि चांगल्या स्थितीत पाहिजे. इंजिन सुरु करुन बघा. इंजिन स्टार्ट करताना काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. असं असेल, तरच डिलीवरी घ्या.
4 कारचे टायर तपासून घ्या. टायरमध्ये पर्याप्त हवा पाहिजे. काही डॅमेज दिसलं, तर लेगच चेक करा.
5 कारचे सगळेच कागद योग्य असले पाहिजेत. यात रजिस्ट्रेशन कार्ड, वीमा पॉलिसी आणि दुसरे डॉक्युमेंट असतात. या सगळ्या गोष्टी बरोबर असतील, तर तुमची कार चांगल्या स्थितीमध्ये आहे. डिलीवरी घ्यायला काही प्रॉब्लेम नाही.
अजूनही काही गोष्टी तपासून घ्या
कारची ऑडियो आणि वीडियो सिस्टमही तपासा.
कारच एयर कंडीशनर चेक करा.
कारच रेडिएटर तपासा.
कारच्या ब्रेकची तपासणी करा. अन्यथा समस्या उद्भवू शकते.
या सगळ्या गोष्टी तपासून पाहा. त्यातून तुम्हाला कारचे फिचर्स आणि सेफ्टी फंक्शन समजतील. काही समस्या दिसल्यास कंपनीकडे दुसऱ्या मॉडेलची मागणी करा.