AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Loan : कार लोन घेताना या गोष्टी ठेवा ध्यानात, लवकर व्हाल कर्जमुक्त

कंपन्यांनी कार लोनची प्रक्रियाही अगदी सोपी केली आहे. अगदी एक दोन दिवसातही कार लोन मंजूर करणाऱ्या कंपण्या आहेत. मात्र ईएमआयच्या ओझ्यामुळे अनेकजण कार घेण्यासाठी थबकतात.

Car Loan : कार लोन घेताना या गोष्टी ठेवा ध्यानात, लवकर व्हाल कर्जमुक्त
कार लोनImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 22, 2023 | 7:27 PM
Share

मुंबई :  सध्या कार खरेदी करणे खूप सोपे झाले आहे. जर काही कारणास्तव तुम्ही नवीन कारसाठी पूर्ण बजेट व्यवस्था करू शकत नसाल, तर तुम्ही कर्ज घेऊन देखील कार खरेदी करू शकता. कंपन्यांनी कार लोनची प्रक्रियाही अगदी सोपी केली आहे. अगदी एक दोन दिवसातही कार लोन मंजूर करणाऱ्या कंपण्या आहेत. मात्र ईएमआयच्या ओझ्यामुळे अनेकजण कार घेण्यासाठी थबकतात. त्यामुळे तुम्हीही लोनवर कार (Car Loan) घेण्याचा विचार करत असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवणे फायद्याचे ठरेल. तुम्हाला एक चांगली डील तर मिळेलच, पण तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेडही सहज करू शकाल.

या गोष्टी ध्यानात ठेवा

बजेट लक्षात ठेवा

कार खरेदी करताना तुमचे बजेट लक्षात ठेवा आणि तुमचा खर्चाची ताकद पाहूनच वाहन निवडा. यासह, तुम्हाला कार कर्ज देखील सहज मिळेल आणि कोणत्याही त्रासाशिवाय ईएमआय भरण्यास सक्षम व्हाल. EMI तुमच्या पगाराच्या 10 टक्कयांपेक्षा जास्त नसेल तर आर्थिक ओढाताण हेणार नाही.

कर्जाचा कालावधी

तुमच्या कर्जाचा कालावधी हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. कमाल 4 वर्षांचे कार कर्ज योग्य मानले जाते. 4 वर्षे हा वाहनासाठी फार मोठा काळ नसतो आणि यामुळे तुम्हाला दरमहा EMI वर बचत करता येते.

पात्रता आणि ऑफर

कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याच्या निकषात बसता की नाही हे जाणून घ्या. काही बँका तुमचा क्रेडिट स्कोअर देखील पाहतात, त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज मिळणे सोपे जाईल. तुम्ही बँकांच्या ऑफर जसे की व्याज दर, प्रक्रिया शुल्क आणि इतर अटी देखील तपासू शकता. जर तुम्हाला बँकेकडून चांगली ऑफर मिळाली तर तुम्ही तुमच्या कर्जाची परतफेड सहज करू शकता.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी