Car Sale : मारुती आणि टाटासह अनेक कंपन्यांच्या वाहन विक्रीत मोठी वाढ

| Updated on: Feb 01, 2021 | 6:00 PM

आजच केंद्रीय अर्थसंकल्पाची घोषणा झाली आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मारुतीने आपल्या विक्रीत 4.3 टक्के वाढ झाल्याची माहिती दिली आहे.

Car Sale : मारुती आणि टाटासह अनेक कंपन्यांच्या वाहन विक्रीत मोठी वाढ
Follow us on

मुंबई : मारुतीसह अनेक कंपन्यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. आजच केंद्रीय अर्थसंकल्पाची घोषणा झाली आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मारुतीने आपल्या विक्रीत 4.3 टक्के वाढ झाल्याची माहिती दिली आहे. जानेवारी 2020 मध्ये देशातील सर्वात मोठी कार निर्माण करणारी कंपनी मारुती सुझुकीनं 1 लाख 54 हजार 123 कार विकल्या होत्या. तर यंदा जानेवारीमध्ये मारुतीच्या एकूण 1 लाख 60 हजार 752 कार विकल्या गेल्या आहेत. दरम्यान मारुतीच्या पॅसेंजर कारच्या विक्रीत मात्र 6.9 टक्क्यांची घट पाहायला मिळत आहे. तर देशांतर्गत कार विक्रीत मारुतीने 0.2 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. तर कार निर्यातीत मारुतीने 29.3 टक्क्यांची वाढ केली आहे.(Large increase in vehicle sales of several companies)

महिंद्रा अॅन्ड महिंद्रा

महिंद्रा अॅन्ड महिंद्राने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2021 मध्ये कंपनीचे 39 हजार 148 वाहन विकले गेले आहेत. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात झालेल्या वाहन विक्रीच्या तुलनेत यंदा 24.4 टक्के विक्री घरसली आहे. तर महिंद्राच्या प्रवासी वाहन विक्रीत मात्र 4 टक्क्यांच्या वाढीसह 20 हजार 634 वाहन विकले गेले आहेत. तर शेती उपकरणांची विक्री 50 टक्क्यांनी वाढून ती 34 हजार 778 युनिट्स झाली आहे.

ह्युंदाईच्या विक्रीत वाढ

ह्युंदाई इंडियाने भारतात 52 हजार 5 युनिट्स विकले. तर 81 हजार युनिट्सची निर्यात केली आहे. म्हणून ह्युंदाई इंडियाचे एकूण 60 हजार 105 युनिट्स विकले गेले आहेत. यासह ह्युंदाई इंडियाच्या एकूण विक्रीमध्ये 15.6 टक्क्यांची वाढ झाली आहे.

टाटाच्या विक्रीत 28 टक्क्यांनी वाढ

टाटा मोटर्सने 28 टक्क्यांच्या वाढीसह एकूण 57 हजार 742 गाड्यांची विक्री केली आहे. टाटाच्या कारची विक्री दुप्पट वाढली असून ती 26 हजार 978 युनिट्सवर पोहोचली आहे. मात्र, टाटाच्या कमर्शियल वाहन्यांच्या विक्रीत 15 टक्क्यांची घट होऊन 2 हजार 145 युनिट्सची विक्री झाली आहे.

वॉल्वो आयशर

वॉल्वो आयशरची जानेवारीमध्ये एकूण विक्री 2.3 टक्क्यांनी वाढून 5 हजार 673 युनिट्स राहिली. देशांतर्गत वाहन विक्रीतही 1.9 टक्क्यांनी वाढ होऊन 4 हजार 871 वाहनांची विक्री झाली. तर वॉल्वोच्या वाहनाच्या निर्यातमध्येही वाढ नोंदवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

Special Story : ‘या’ आहेत सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या देशातील टॉप 5 इलेक्ट्रिक कार्स

Special Stroy: भूकंपामुळे सुरु झाली ‘ही’ कार कंपनी; आता विकतेय जगात सर्वाधिक कार

‘या’ 7 फिचर्समुळे 2021 Tata Safari या वर्षातली बेस्ट SUV ठरणार?

Large increase in vehicle sales of several companies