AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात स्वस्त तीन कार्सवर तब्बल 50 हजारांचा डिस्काऊंट, ऑफर संपण्यासाठी उरले दिवस…

देशातील अनेक कार उत्पादक कंपन्यांनी या वर्षीच्या सुरुवातीलाच वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही जर नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.

सर्वात स्वस्त तीन कार्सवर तब्बल 50 हजारांचा डिस्काऊंट, ऑफर संपण्यासाठी उरले दिवस...
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 28, 2021 | 3:39 PM
Share

मुंबई : देशातील अनेक कार उत्पादक कंपन्यांनी या वर्षीच्या सुरुवातीलाच वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही जर नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नव्या वर्षानिमित्त कार खरेदी करणार आसाल तर आम्ही तुम्हाला देशातील सर्वात स्वस्त अशा तीन कार्सबद्दल माहिती देणार आहोत. विशेष म्हणजे या कार्सवर 50 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. या यादीत मारुती सुझुकी (Maruti Suzuki), रेनॉ (Renault) आणि डॅट्सन (Datsun) या कंपन्यांच्या कार्सचा समावेश आहे. (Up to 50000 discounts on 3 cheapest cars of the india, only chance till 31st January)

या स्वस्तातल्या कार्सची आणि त्यावरील डिस्काऊंट ऑफर्सची माहिती घेण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे या ऑफरची वैधता. कारण ही डिस्काऊंट ऑफर केवळ 31 जानेवारीपर्यंतच असणार आहे. त्यामुळे ही ऑफर क्लेम करण्यासाठी तुमच्याकडे खूपच कमी वेळ शिल्लक आहे. चला तर मग जाणून घ्या की मारुती, रेनॉ आणि डॅट्सनच्या स्वस्तातल्या कार्सवर किती रुपयांची सूट दिली जात आहे.

डॅटसन गो, गो+ आणि रेडी (Datsun Go, Datsun Go plus, Datsun redi-GO)

डॅटसन गो या गाडीवर 40 हजार रुपयांपर्यंत बेनेफिट ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये 20 हजार रुपयांच्या कॅश डिस्काऊंटचा समावेश आहे. तसेच 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसही देण्यात आला आहे. Datsun Go ची एक्स शोरुम किंमत 4 लाख 2 हजार रुपये इतकी आहे. तर Datsun Go plus या कारची किंमत 4 लाख 25 हजार रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरु होते.

Datsun redi-GO या मॉडलवर ग्राहकांना 35 हजार रुपयांपर्यंत बेनेफिट ऑफर देण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात कंपनी या कारवर 15 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट देत आहे. तसेच 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जातोय. सोबतच 5 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जातोय. या मॉडेलची एक्स शोरुम किंमत 2 लाख 86 हजार रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरु होते.

Datsun Go या कारमध्ये ग्राहकांना 1.2 लीटर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 75.94 Hp मॅक्सिमम पॉवर आणि 104 Nm टॉर्क जेनरेट करु शकतं. ही कार 5-स्पीड मॅनुअल आणि सीवीटी ट्रान्समिशनच्या पर्यांयासह उपलब्ध आहे. ही BS6 Datsun Go 19.02 kmpl आणि CVT मध्ये 19.59 kmpl मायलेज देते.

मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto)

या कारवर कंपनीने 31 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट सादर केला आहे. यामध्ये 15 हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट आणि 15 हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. तसेच या कारवर 4 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस ऑफर देण्यात आली आहे. मारुती अल्टो 800 (Maruti Suzuki Alto 800) या कारची किंमत 2 लाख 99 हजार रुपयांपासून सुरु होते.

या कारच्या इंजिन आणि पॉवरबाबत बोलायचे झाल्यास मारुती सुझुकी अल्टोमध्ये 796cc चं 3 सिलेंडर इंजन देण्यात आलं आहे. हे 6000 Rpm वर 47.3 Hp मॅक्सिमम पॉवर आणि 3500 Rpm वर 69 Nm पीक टॉर्क जनरेट करु शकतं. ही कार 5-स्पीड मॅनुअल ट्रान्समिशनसह येते. या कारच्या मायलेजच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मारुती सुझुकी अल्टो 1 लीटर पेट्रोलमध्ये 22.05 kmpl इतकं मायलेज देते. या गाडीचं सीएनजी मॉडेलही उपलब्ध आहे. या कारचं मायलेज 31.59 Km/kg इतकं आहे.

रेनॉ क्विड (Renault Kwid)

Renault Kwid या कारवर ग्राहकांना 50,000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट देण्यात आला आहे. यामध्ये 10 हजार रुपयांचा कॉर्पोरेट बोनस किंवा स्पेशल बोनस मिळले. सोबतच एक्सचेंज बोनस आणि कॅश डिस्काऊंटही देण्यात आला आहे. तसेच कंपनीकडून 5.99 टक्के व्याजदरावर ही कार खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. Renault Kwid या कारची सुरुवातीची किंमत 3.12 लाख रुपये इतकी आहे, तर या कारच्या टॉप वेरियंटची किंमत 5.31 लाख रुपये इतकी आहे. Renault Kwid BS6 या कारमध्ये तुम्हाला 1.0 लीटरचे 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन 68 hp मॅक्सिमम पॉवर आणि 91 Nm पीक टॉर्क जनरेट करु शकतं. ही कार 21-22 किमी प्रति लीटरपर्यंत मायलेज देते.

हेही वाचा

‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5 सीटर कार, किंमत 5 लाखांहून कमी

जुनी अल्टो कार खरेदी करण्याचा विचार करताय? मग, इथे मिळेल स्वस्त आणि मस्त डील!

धमाकेदार स्टाईल आणि फीचर्ससह आज लॉन्च होणार Renault Kiger, सगळ्यात कमी आहे किंमत

(Up to 50000 discounts on 3 cheapest cars of the india, only chance till 31st January)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या