‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5 सीटर कार, किंमत 5 लाखांहून कमी

तुम्ही जर नव्या वर्षानिमित्त कार खरेदी करणार आसाल तर आम्ही तुम्हाला पाच लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या 5 सीटर कार्सबद्दल माहिती देणार आहोत.

'या' आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5 सीटर कार, किंमत 5 लाखांहून कमी
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 10:00 AM

मुंबई : देशातील अनेक कार उत्पादक कंपन्यांनी या वर्षीच्या सुरुवातीलाच वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही जर नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नव्या वर्षानिमित्त कार खरेदी करणार आसाल तर आम्ही तुम्हाला पाच लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या 5 सीटर कार्सबद्दल माहिती देणार आहोत. (Car Buyer Guide : Cheapest 5 seater cars Available in India under 5 lakhs)

Datsun Go : Datsun Go या कारमध्ये ग्राहकांना 1.2 लीटरचं पेट्रोल इंजिन मिळेल, जे 75.94 Hp मॅक्सिमम पॉवर आणि 104 Nm टॉर्क जेनरेट करु शकतं. ही कार 5-स्पीड मॅनुअल आणि सीवीटी ट्रान्समिशनच्या पर्यांयासह उपलब्ध आहे. ही BS6 Datsun Go 19.02 kmpl आणि CVT मध्ये 19.59 kmpl मायलेज देते. भारतात BS6 Datsun Go ही कार 4.02 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) खरेदी करता येईल.

Renault Kwid BS6 : Renault Kwid BS6 या कारमध्ये तुम्हाला 1.0 लीटरचे 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन 68 hp मॅक्सिमम पॉवर आणि 91 Nm पीक टॉर्क जनरेट करु शकतं. ही कार 21-22 किमी प्रति लीटरपर्यंत मायलेज देते. Renault Kwid BS6 या कारची सुरुवातीची किंमत (एक्स शोरूम) 3.12 लाख रुपये इतकी आहे.

Maruti Suzuki Celerio : मारुती सुझुकी सेलेरियो ही कार भारत उपलब्ध असलेली एक लोकप्रिय कार आहे. या कारमध्ये 998 cc चं BS6 कम्प्लायंट इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 6000 Rpm वर 50kw पॉवर आणि 3500Rpm वर 90Nm टॉर्क जनरेट करु शकतं. Maruti Suzuki Celerio या कारची लांबी 3695mm, रुंदी 1600mm, उंची 1560mm, व्हीलबेस 2425mm, वजन 1250 किलो आणि 35 लीटर इतकी क्षमता असलेला फ्युल टँक आहे. ही कार तुमच्या छोट्या कुटुंबासाठी परफेक्ट कार आहे. या कारची किंमत 4.90 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

Maruti Suzuki Alto : इंजिन आणि पॉवरबाबत बोलायचे झाल्यास मारुती सुझुकी अल्टोमध्ये 796cc चं 3 सिलेंडर इंजन देण्यात आलं आहे. हे 6000 Rpm वर 47.3 Hp मॅक्सिमम पॉवर आणि 3500 Rpm वर 69 Nm पीक टॉर्क जनरेट करु शकतं. ही कार 5-स्पीड मॅनुअल ट्रान्समिशनसह येते. या कारच्या मायलेजच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मारुती सुझुकी अल्टो 1 लीटर पेट्रोलमध्ये 22.05 kmpl इतकं मायलेज देते. या गाडीचं सीएनजी मॉडेलही उपलब्ध आहे. या कारचं मायलेज 31.59 Km/kg इतकं आहे. मारुती अल्टोची सुरुवातीची किंमत 2,94,800 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

Maruti S-Presso : मारुती एस-प्रेसो हीदेखील एक स्वस्त कार आहे. या कारमध्ये कंपनीने 998cc क्षमतेचं 3 सिलेंडर K10B पेट्रोल इंजिन दिलं आहे. हे इंजिन 55,00 आरपीएमवर 67 बीएचपी मॅक्सिमम पॉवर आणि 35,00 आरपीएम पर 90 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करतं. या कारमध्ये 5 स्पीड मॅनुअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो. मारुती एस-प्रेसो 1 लीटर पेट्रोलमध्ये 21.4 किलोमीटर मायलेज देते. या कारची एक्स शोरुम किंमत 3.70 रुपये इतकी आहे.

हेही वाचा

Special Story : 2021 मध्ये इलेक्ट्रिक कार्सचा जलवा, टाटा, महिंद्रा ते टेस्ला, अनेक बड्या कंपन्या शानदार कार लाँच करणार

पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त, एक युनिट चार्जिंगवर ‘इतके’ किलोमीटर धावेल इलेक्ट्रिक कार!

टाटाच्या नव्या Safari चा फर्स्ट लूक, काय आहेत फीचर्स?

(Car Buyer Guide : Cheapest 5 seater cars Available in India under 5 lakhs)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.