Electric Car | पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त, एक युनिट चार्जिंगवर ‘इतके’ किलोमीटर धावेल इलेक्ट्रिक कार!

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Jan 14, 2021 | 2:31 PM

सध्या बरेच लोक पेट्रोल आणि डिझेल कारऐवजी इलेक्ट्रिक कार खरेदीमध्ये अधिक रस दाखवत आहेत. सरकारही लोकांना इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

Electric Car | पेट्रोल-डिझेलपेक्षाही स्वस्त, एक युनिट चार्जिंगवर ‘इतके’ किलोमीटर धावेल इलेक्ट्रिक कार!

Follow us on

मुंबई : सध्या बरेच लोक पेट्रोल आणि डिझेल कारऐवजी इलेक्ट्रिक कार खरेदीमध्ये अधिक रस दाखवत आहेत. सरकारही लोकांना इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. दिल्ली सरकार इलेक्ट्रिक कारवर सबसिडी देखील देत ​​आहे. त्याच वेळी, केंद्र सरकारने इलेक्ट्रिक कारवरील जीएसटी कमी करण्यास आणि आयकरात सूट देण्याविषयीही वक्तव्य केले होते. आता, इलोन मस्कची जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी ‘टेस्ला’ भारतात दाखल झाली आहे (Electric car mileage and comparison with other fuel cars).

यावरूनच अंदाज बांधता येतो की, भारतात इलेक्ट्रिक कारची क्रेझही सतत वाढत आहे. जे लोक इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्या मनात इलेक्ट्रिक कारसंदर्भात बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. जसे की, ही कार चालवण्यासाठी किती खर्च येईल? किती युनिट विजेवर ही कार किती किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकेल? किंवा त्याची बॅटरी कशी चार्ज होईल?, असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला कळेल की पेट्रोल-डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार किती मायलेज देईल…

इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीची क्षमता किती?

इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीची क्षमता त्यांच्या वेगवेगळ्या मॉडेल्सवर अवलंबून असते. भारतात अद्याप फारशा इलेक्ट्रिक कार नाहीत. पण, सध्या भारतात विकल्या गेलेल्या कार्सची बॅटरी 15 ते 19 केएमएच आहे. टाटा, महिंद्र या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीची क्षमता 15-18 केएमएच पर्यंत आहेत. तसे, जर आपण महागड्या मोटारींबद्दल बोललो, तर त्यात बॅटरीचा आकार देखील मोठा असतो आणि यामुळे कारच्या वेगावरही परिणाम होतो. बर्‍याच टेस्ला कारमध्ये 80 केएमएचच्या बॅटरी देखील असतात.

एका चार्जमध्ये किती किलोमीटरचे मायलेज?

एका चार्जमध्ये कार किती चालेल हे प्रत्येक कारच्या इंजिनवर अवलंबून असत. परंतु, सर्वसाधारणपणे 15 केएमएच बॅटरीच्या एका चार्जवर 100 किमीपर्यंत कार चालवली जाऊ शकते. बर्‍याच कार यापेक्षा कमी मायलेज देतात. परंतु, हे प्रमाण स्टँडर्ड प्रमाण मानले जाते. अशा वेळी, आपण इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीनुसार मायलेजचा अंदाज लावू शकता. त्याच वेळी, टेस्लाच्या काही कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटरहून अधिक धावतात (Electric car mileage and comparison with other fuel cars).

एकावेळेस किती चार्ज होईल?

इलेक्ट्रिक कारची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यास किती वेळ लागेल हे पूर्णपणे वीज पुरवठ्यावर अवलंबून असते. आपल्या पॉवर पॉईंटच्या क्षमतेवर हे अवलंबून असते. आपण ही बॅटरी घरी चार्ज केल्यास 15 ते 18 केएमएच बॅटरी चार्ज होण्यासाठी तब्बल 9 ते 11 तास लागतात.

कार चार्जिंगसाठी किती खर्च येईल?

आपण इलेक्ट्रिक कार वापरत असल्यास, ही कार पेट्रोलपेक्षा स्वस्त पडत असल्याचे आपल्या लक्षात येईल. आपण बॅटरी चार्ज करत असाल, तर 1KMh बॅटरी चार्ज करण्यासाठी 1 युनिट विजेचा किंवा त्याहून कमी खर्च येऊ शकतो. याचे प्रमाण लक्षात घेऊन आपण किती किलोमीटरपर्यंत आणि किती खर्चात ही कार चालवू शकता याचा अंदाज लावता येईल. आपण आपल्या राज्यातील वीज दराच्या आधारे याचा अंदाज लावू शकता.

(Electric car mileage and comparison with other fuel cars)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI