Special Story : 2021 मध्ये इलेक्ट्रिक कार्सचा जलवा, टाटा, महिंद्रा ते टेस्ला, अनेक बड्या कंपन्या शानदार कार लाँच करणार

अनेक दिग्गज कार कंपन्या 2021 मध्ये इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. टाटा, महिंद्रा आणि मारुतीसारख्या भारतीय कंपन्यादेखील यामध्ये आघाडीवर आहेत.

Special Story : 2021 मध्ये इलेक्ट्रिक कार्सचा जलवा, टाटा, महिंद्रा ते टेस्ला, अनेक बड्या कंपन्या शानदार कार लाँच करणार
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 7:52 AM

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज कार कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. (Tata, Mahindra, Maruti, Hyundai, Volvo and Tesla to Launch Electric cars in India in 2021)

बंगळुरूची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Pravaig Dynamics ने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कार प्रॅवाइग एक्सटिन्शन एमके 1 (Pravaig Extinction Mk1) लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच कंपनीने या कारबाबतची काही माहिती सादर केली आहे. 2021 च्या सुरूवातीला ही कार लॉन्च होऊ शकते. विशेष म्हणजे ही कार एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर 500 किमीपर्यंत धावेल असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे कारप्रेमींच्या मनात ही कार नक्की बसणार असं बोललं जात आहे.

30 मिनिट चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 300 किलोमीटरपर्यंत धावेल. Pravaig Dynamics ने म्हटलं आहे की, या कारचा कमाल वेग 196 किलोमीटर प्रति तास इतका आहे. ही कार अवघ्या 5.4 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका स्पीड पकडते. सोबतच भारतातील आघाडीच्या कार कंपन्याही लवकरच इलेक्ट्रिक कार्स लाँच करणार आहेत. टाटा, महिंद्रा, मारुती सुझुकी या तीन भारतीय कंपन्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सोबतच अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यादेखील त्यांच्या इलेक्ट्रिक कार्स भारतात लाँच करणार आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आगामी काळात भारतात लाँच होणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सबद्दलची माहिती देणार आहोत.

महिंद्रा ईकेयूव्ही 100 (Mahindra EKUV100)

Mahindra & Mahindra कंपनीने इलेक्ट्रिक कार्सवर लक्ष केंद्रित केलं आहे. कंपनी यंदा Mahindra EKUV100 ही कार लाँच करु शकते. या कारची किंमत 8.25 लाख रुपये इतकी असेल. ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असेल असा दावा करण्यात आला आहे. महिंद्राने ही कार Auto Expo 2020 मध्ये सादर केली होती. तेव्हापासून कारप्रेमी या कारची वाट पाहात आहेत. महिंद्राच्या या कारमध्ये लिक्विड कूल्ड बैटरी पॅक आहे. ही बॅटरी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे अवघ्या 55 मिनिटांमध्ये ही कार 80 टक्के चार्ज होईल. यामध्ये 15.9 किलोवॅटची लिक्विड कूल मोटर देण्यात आली आहे, जी 54Ps पॉवर आणि 120NM टॉर्क जेनरेट करते. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 147 किलोमीटरपर्यंत धावू शकते. Mahindra eKUV100 चा फ्रंट फेसिंग लुक या कारच्या स्टँडर्ड वेरिएंटसारखाच आहे. केवळ या कारच्या फ्रंट फेसमध्ये eFalcon चे बॅजेस दिले आहेत. तसेच या कारमध्ये फुल टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिमही मिळेल. सोबतच या कारमध्ये स्टियरिंग माऊंटेड ऑडियो कंट्रोल फिचर, मॅनुअल एयर कंडिशनिंग, रिमोट आणि सेंट्रल लॉक असे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

महिंद्रा एक्सयूव्ही 300 इलेक्ट्रिक (Mahindra XUV300 Electric)

महिंद्रा कंपनीने त्यांची Mahindra XUV300 Electric कार या वर्षी ऑटो एक्सपो मध्ये सादर केली होती. कंपनी आता ही कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही एसयूव्ही 40kWh (स्टँडर्ड) आणि 60kWh (लाँग रेंज) बॅटरी ऑप्शनसह लाँच केली जाऊ शकते. कंपनीने दावा केला आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 370 ते 450 किलोमीटरपर्यंत धावेल. या कारची किंमत तब्बल 15 ते 29 लाख रुपये असू शकते.

मारुती वॅगनआर इलेक्ट्रिक (Maruti WagonR electric)

Maruti WagonR electric या कारमध्ये Lithium-Ion Battery चा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या बॅटरीवरील खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे. या कारबाबतचे जे रिपोर्ट्स समोर आले आहेत, त्यानुसार ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 150 किलोमीटरपर्यंत धावेल. एका तासात या कारमधील बॅटरी 80 टक्के चार्ज करता येईल. WagonR electric ही कार यावर्षी टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळाली होती. ही कार पुढील वर्षी लाँच केली जाऊ शकते. या कारची किंमत 8 लाख रुपयांच्या आसपास असेल, असं म्हटलं जात आहे.

ह्युंदाय कोना EV फेसलिफ्ट (Hyundai Kona EV Facelift 2021)

ह्युंदाय कंपनी कोना EV फेसलिफ्ट 2021 च्या रुपाने भारतात पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. डिसेंबर 2020 मध्ये ही कार ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार लुक्स आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जबरदस्त सिद्ध होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Volvo XC40 रिचार्ज (Volvo XC40 Recharge)

वोल्वो कंपनी त्यांची XC40 रिचार्ज ही इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. वोल्वोची ही भारतात लाँच होणारी पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे. या गाडीमध्ये तुम्हाला 78kWh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. जी दोन इलेक्ट्रिक मोटर्ससोबत येईल. दोन्ही 402hp आणि 660Nm टॉर्क जनरेट करु शकतात. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 400 किमीपर्यंत धावेल.

Triton इलेक्ट्रिक व्हीकल (Triton Electric Vehicle / Triton EV0

यूएस आधारित कंपनी Triton इलेक्ट्रिक व्हीकल भारतात लाँच करणार आहे. N4 सेडानच्या रुपाने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 35 लाख रुपये असेल. ही इलेक्ट्रिक सेडान अमेरिकेतच विकसित करण्यात आली आहे, तिथेच ती बनवली जाईल. ही कार 75KwH आणि 100KwH बॅटरी ऑप्शन्ससह सादर केली जाईल. एकदा चार्ज केल्यानंतर ही कार 523 किमी आणि 696 किमीपर्यंत धावेल.

टेस्ला मॉडल 3 (Tesla Model 3)

सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर आता टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. टेस्ला कंपनीने कर्नाटकमधील बंगळुरु येथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. कंपनी बंगळुरुत लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती आणि विक्री करणार आहे. कंपनीने बंगळुरुत कामाला सुरुवातदेखील केली आहे. टेस्ला कंपनीने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की ते भारतात त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार टेस्ला मॉडल 3 लाँच करणार आहेत. ही एक सेडान कार आहे. टेस्लाने आता भारतात कंपनी स्थापन केली आहे. त्यामुळे या कारच्या लाँचिंगला आता वेग येणार आहे, असे बोलले जात आहे.

Toyota कडून सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, एकदा चार्ज केल्यावर 150 किमी धावणार

एकीकडे मोठमोठ्या कंपन्या 2021 मध्ये भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला टोयोटाने भारतात एक इलेक्ट्रिक कार नुकतीच लाँच केली आहे. टोयोटा मोटर कॉर्पोरेशनने दोन आठवड्यांपूर्वी C+pod अल्ट्रा कॉम्पॅक्ट बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच केली आहे. ही कार कॉर्पोरेट युजर्स, लोकल गवर्मेंट आणि इतर कंपन्यांसाठी उपलब्ध केली आहे. टोयोटा कंपनी सध्या Battery Electric Vehicle ला प्रोमोट करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये नवीन बिझनेस मॉडेल आणि 2022 पर्यंत लाँच होणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.

नवीन C+pod एक इलेक्ट्रिक टू सीटर BEV आहे. ही कार टोयोटाने मोबिलिटी ऑप्शन म्हणून लाँच केली आहे. या कारमधील इलेक्ट्रिक मोटर 9.2 kW आणि 56 Nm टॉर्क जनरेट करते. या गाडीचं वजन केवळ 690 किलो आहे. 5-16 तास चार्ज केल्यानंतर ही कार 60 किमी प्रति तास इतक्या वेगाने धावते. ही कार आकारानेही लहान आहे. या कारची लांबी केवळ 2,490mm, रुंदी 1290 mm आणि उंची 1,550 mm आहे. या कारमध्ये केवळ दोन व्यक्ती बसू शकतात. या कारचे एक्सटीरियर पॅनल्स प्लॅस्टिकपासून बनवले आहेत. त्यामुळे कारचे वजन कमी करण्यात मदत मिळाली आहे. Toyota C+pod ची साइज छोटी असल्याने कारचे इंटीरियर सुद्धा कॉम्पॅक्ट आहे.

या कारच्या इंस्ट्रूमेंट पॅनलमध्ये स्पीडोमीटर सोबत अन्य फंक्शनल इक्यूपमेंट यांसारखे फिचर्स देण्यात आहेत. तसेच स्विचला सेंटर पॅनेल दिले आहे. सध्या या कारला केवळ कॉर्पोरेट्ससाठी बाजारात उतरवले आहे. सामान्य ग्राहकांसाठी 2022 पर्यंत ही कार लाँच केली जाऊ शकते. टोयोटाने ही कार दोन व्हेरियंट्समध्ये लाँच केली आहे. ज्यात X आणि G व्हेरियंट्सचा समावेश आहे. एक्स व्हेरियंटची किंमत 1.65 लाख मिलियन येन म्हणजेच जवळपास 11.73 लाख रुपये आहे आणि जी व्हेरियंटची किंमत 1.71 मिलियन म्हणजेच 12.2 लाख रुपये इतकी आहे.

संबंधित बातम्या

देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली, टाटा मोटर्सच्या Nexon EV च्या 2,200 युनिट्सची विक्री

पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार

आता इलेक्ट्रिक कार चार्ज करावी लागणार नाही, ही कंपनी बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिस सुरु करणार

(Tata, Mahindra, Maruti, Hyundai, Volvo and Tesla to Launch Electric cars in India in 2021)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.