AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार

सगळ्यात विशेष म्हणजे ही कार एकाच चार्जमध्ये 500 किमीपर्यंत चालणार असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे कार प्रेमींच्या मनात ही कार नक्की बसणार असं बोललं जात आहे.

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार
| Edited By: | Updated on: Dec 27, 2020 | 11:52 PM
Share

मुंबई : हल्लीच्या तरुणांमध्ये कारचा क्रेझ पाहायला मिळतो. अशात आता इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आकर्षण ठरत आहेत. बंगळुरूची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Pravaig Dynamics ने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कार प्रॅवाइग एक्सटिन्शन एमके 1 (Pravaig Extinction Mk1) लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. 2021 च्या सुरूवातीला ही कार लॉन्च होऊ शकते. सगळ्यात विशेष म्हणजे ही कार एकाच चार्जमध्ये 500 किमीपर्यंत चालणार असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे कार प्रेमींच्या मनात ही कार नक्की बसणार असं बोललं जात आहे. (auto news pravaig extinction electric car is going to launch in 2021 soon)

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 30 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये कार तब्बल 300 किलोमीटरपर्यंत धावू शकते. Pravaig Dynamics च्या नुसार, या कारचा कमाल वेग हा ताशी 196 किलोमीटर आहे. त्याचबरोबर ही कार ताशी 5 ते 100 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वाढवू शकते. त्यामुळे ही कार प्रेमींसाठी आकर्षण ठरणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Pravaig Extinction Mk1 कारमध्ये 155 किलोवॅट क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यामुळे कार उत्तम धावते आणि गती मिळते. कंपनीच्या म्हणण्यानुसार 30 मिनिटांत या कारची बॅटरी 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारची बॅटरी क्षमता मर्सिडीज एस-क्लास आणि टेस्ला कारच्या बरोबरीची आहे.

या कारशी असेल Mk1 कारची स्पर्धा

अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने नुकतीच भारतात त्यांची ईव्ही कार बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. पुढच्या वर्षी ही कार ते भारतात लॉन्च करणार आहेत. इतकंच नाही तर टाटा नेक्सन ईव्ही (Tata Nexon EV), एमजी झेडएस ईव्ही (MG ZS EV) आणि ह्युंदाई कोना (Hyundai Kona) आधीपासूनच देशात इलेक्ट्रिक कार बनवत आहेत. अशात Pravaig Dynamics ची ही कार बाजारात या सर्व कार्सला स्पर्धा देणार अशी चर्चा आहे. (auto news pravaig extinction electric car is going to launch in 2021 soon)

संबंधित बातम्या –

लाखो दिल की धडकन! 2021 मध्ये Royal Enfield च्या चार नव्या बुलेट, वाचा सविस्तर

प्रतीक्षा संपली! भारतात बनलेली KTM 490 लाँच होणार, जाणून घ्या काय आहे खास?

SUV सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यास मारुती सुझुकी सज्ज, कंपनी पाच कार लाँच करण्याच्या तयारीत

(auto news pravaig extinction electric car is going to launch in 2021 soon)

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल