AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SUV सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यास मारुती सुझुकी सज्ज, कंपनी पाच कार लाँच करण्याच्या तयारीत

मारुती सुझुकी इंडियाने आगामी काळात नवीन स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) मॉडेल्स लाँच करण्याचा प्लॅन केला आहे.

SUV सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालण्यास मारुती सुझुकी सज्ज, कंपनी पाच कार लाँच करण्याच्या तयारीत
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 26, 2020 | 5:36 PM
Share

मुंबई : मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) आगामी काळात नवीन स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल (SUV) मॉडेल लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी त्यांच्या इतर प्रोडक्ट्सपासून एसयूव्ही सेगमेंट वेगळं करणार आहे. SUV सेगमेंटमध्ये सध्या भारतात ह्युंदाय आणि किआ मोटर्स या दोन कंपन्यांची स्थिती मजबूत आहे. मारुती सुझुकी सध्या या कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे. (Maruti Suzuki making big entry in SUV market, will launch 5 new cars in India)

मारुती सुझुकी कंपनी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंट मध्ये 3 नवीन मॉडल लाँच करणार आहे. 2022 च्या पहिल्या सहामाहीत नवीन विटारा ब्रेजा लाँच केली जाणार आहे. तर दुसऱ्या सहामाहीत एक मिड साईज एसयूव्ही लाँच केली जाणार आहे. ही नवी कार ह्युंदाई क्रेटा आणि केएल सोनेटला टक्कर देईल. टाटा नेक्सॉनला टक्कर देण्यासाठी एक मॉडेल बनवलं जात असतून ती कार 2022 मध्ये लाँच केली जाणार आहे. ही क्रॉसओवर कार बलेनो प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. तसेच कंपनी मारुती सुझुकी जिम्नी भारतात लाँच करु शकते. काही दिवसांपूर्वी याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यात म्हटलं होतं की, कंपनी 5 डोर जिम्नी भारतात 2023 पर्यंत लाँच करू शकते.

सध्या भारतासह जगभरात एसयूव्हीला मागणी वाढत आहे. मजबुती आणि रुबाबदार लुक्समुळे लोक एसयूव्हीकडे आकर्षित होत आहेत. यंदा एका वर्षात ज्या नव्या कार लाँच करण्यात आल्या, त्यापैकी अर्ध्याहून अधिक कार या एसयूव्ही आहेत. या कार्सना मोठी मागणी आहे. त्यामुळे सर्व कंपन्या आगामी काळात नवनव्या एसयूव्ही लाँच करण्याचा मार्गावर आहेत. मार्केटची परिस्थिती पाहून मारुतीनेदेखील नव्या एसयूव्ही कार्सची निर्मिती करण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनी आगामी काळात पाच नव्या एसयूव्ही लाँच करणार आहे. Maruti Suzuki S-Cross आणि Maruti Suzuki Vitara Brezza या दोन कार्सनादेखील सध्या वाढती मागणी आहे.

डिझेल सेगमेंटमध्ये उतरण्यासाठी मारुती सज्ज

मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India- MSI) पुढील वर्षी डिझेल सेगमेंटमध्ये (Diesel Segment) उतरण्याची शक्यता आहे. डिझेल सेगमेंटमधील वाहनांना ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचे उद्योग विभागातील सूत्रांनी सांगितले आहे. विशेषत: एसयूव्ही आणि मल्टिपर्पज व्हेईकल (MPV) विभागांतील वाहनांना चांगली मागणी आहे, त्यामुळे मारुती पुन्हा डिझेल वाहन विभागात उतरण्याची योजना बनवण्याच्या तयारीत आहे.

यावर्षी एप्रिलपासून बीएस-VI उत्सर्जनाबाबतचे कडक नियम लागू झाल्यानंतर वाहन क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या मारुतीने डिझेल मॉडेल्स बंद केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मारुतीने त्यांचा मानेसर पॉवरट्रेन प्लांट अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून ते पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत किंवा उत्सवांच्या हंगामात बीएस-VI डिझेल इंजिन (BS-VI diesel engines) व्हेईकल सादर करु शकतील.

हेही वाचा

जानेवारीमध्ये TATA लॉन्च करणार दोन जबरदस्त कार्स, वाचा काय आहे वैशिष्ट्ये आणि किंमत ?

Renault ची ‘ही’ कार ठरणार सर्वात स्वस्त?, किंमत बघून थक्क व्हाल

(Maruti Suzuki making big entry in SUV market, will launch 5 new cars in India)

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?