लाखो दिल की धडकन! 2021 मध्ये Royal Enfield च्या चार नव्या बुलेट, वाचा सविस्तर

रॉयल एनफील्ड कंपनीची भारतात तीन नव्या बाईक आणि एक RE Himalayan ची अपडेट वर्जन लॉन्च करण्याची योजना आहे (Royal Enfield bikes is planning to launch 4 bikes in 2021).

लाखो दिल की धडकन! 2021 मध्ये Royal Enfield च्या चार नव्या बुलेट, वाचा सविस्तर
रॉयल एनफिल्डच्या तीन नव्या बाईक्स लवकरच बाजारात
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 11:24 PM

मुंबई : Royal Enfield ची बुलेट ही कित्येक तरुणांची जीव की प्राण असते. कित्येक तरुणांचं Royal Enfield ची बुलेट घेण्याचं स्वप्न असतं. अशाच काही तरुणांसाठी आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. कंपनीने पुढच्या वर्षी प्रत्येकी तीन महिन्यात 250 सीसी ते 750 सीसीच्या गाड्या लॉन्च करण्याची योजना आखली आहे. रॉयल एनफील्डची भारतात तीन नव्या बाईक आणि एक RE Himalayan ची अपडेट वर्जन लॉन्च करण्याची योजना आहे. 2021 साली येणाऱ्या या नव्या बाईक्सची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (Royal Enfield bikes is planning to launch 4 bikes in 2021).

क्लासिक 350

Classic 350, 350cc सेगमेंटच्या बाईक प्रचंड लोकप्रिय आहे. आता कंपनी न्यू जनरेशन मॉडल लॉन्च करणार आहे. नवी बाईक 2021 च्या दुसऱ्या तिमाहीत लॉन्च होण्याची शक्यता आहे. नव्या क्लासिक 350 मध्ये 349 cc सिंग-सिलेंडर, एअर-कुल्ड इंजिन असणार आहे जे सध्या RE Meteor 350 मध्ये आहे.

रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 350

कंपनी सध्या इंटरसेप्टर 350 वर्जनवर काम करत आहे. नव्या वर्जनच्या चाचणीचा फोटो नुकताच समोर आला होता. या मॉडेलमध्ये ट्विन एग्जॉस्टच्या ऐवजी सिंगल साइड-माउंटेड एग्जॉस्ट देण्यात आलं आहे. याशिवाय बरेच फिचर्स इंटरसेप्टर 650 सारखे असणार आहेत.

रॉयल एनफील्ड 650 क्रूजर

या बाईकची गेल्या कित्येत दिवसांपासून वाट बघितली जात आहे. अखेर 2021 मध्ये ही बाईक लॉन्च होणार आहे. या बाईकमध्ये लाँग व्हिलबेससोबत स्लंग प्रोफाईल असणार आहे. या बाईकला गोलाकार हेडलॅम्प, मिश्रधातूची चाके, पातळ इंधनाची टाकी, क्रोम ट्विन एक्झॉस्ट कॅनास्टार आणि मोठी सीट असेल.

अपडेटेड रॉयल एनफील्ड हिमालयन

कंपनी ही बाईक देखील 2021 मध्ये लॉन्च करणार आहे. या बाईकमध्ये न्यू ट्रिपर नेविगेशन सिस्टम असेल, जी याआधी RE Meteor 350 मध्ये होती. याशिवाय या बाईकमध्ये यूएसबी चार्जर असते. याशिवाय ही बाईक अनेक रंगांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे (Royal Enfield bikes is planning to launch 4 bikes in 2021).

हेही वाचा : प्रतीक्षा संपली! भारतात बनलेली KTM 490 लाँच होणार, जाणून घ्या काय आहे खास?

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.