AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता इलेक्ट्रिक कार चार्ज करावी लागणार नाही, ही कंपनी बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिस सुरु करणार

इलेक्ट्रिक कार्सबाबत लोकांची एक तक्रार असते, ती म्हणजे कारची बॅटरी चार्ज करण्यासाठी खूप वेळ लागतो. समस्येवर हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीने एक तोडगा काढला आहे.

आता इलेक्ट्रिक कार चार्ज करावी लागणार नाही, ही कंपनी बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिस सुरु करणार
| Updated on: Dec 30, 2020 | 6:51 PM
Share

मुंबई : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. परंतु इलेक्ट्रिक कार्सबाबत लोकांची एक तक्रार असते, ती म्हणजे कारची बॅटरी चार्ज करण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे अनेकजण इच्छा असूनही इलेक्ट्रिक कार्स खरेदी करत नाहीत. त्यामुळे कमीत कमी वेळात कारची बॅटरी चार्ज कशी करता येईल, यासाठी जगभरात संशोधन सुरु आहेच, सोबतच काही कंपन्यांनी एक ते दोन तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल अशा बँटरी तयार केल्या आहेत. तरीदेखील एक ते दोन तास हे जास्तच आहेत. लांबच्या प्रवासासाठी जाणारे लोक दर काही वेळाने थांबून एक-दोन तास वाया घालवू शकत नाहीत. तसेच भारतात इलेक्ट्रिक कार्ससाठीचं इन्फ्रास्ट्रक्चरदेखील तयार नाही. त्यामुळे वाहनधारकांसाठी अनेक अडचणी आहेत. या समस्येवर हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) कंपनीने एक तोडगा काढला आहे. कंपनी त्यांच्या निवडक पेट्रोल पंपांवर बँटरी स्वॅपिंग स्टेशन सुरु करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे वाहनधारक कोणत्याही त्रासाशिवाय इलेक्ट्रिक कार घेऊन लाँग ड्राईव्हवर जाऊ शकतील. (HPCL partners with VoltUp for battery swapping solutions across India)

HPCL ची VoltUp सोबत भागिदारी

हिन्दुस्तान पेट्रोलियमने ही नवी सुविधा प्रदान करण्यासाठी VoltUp बॅटरी स्वॅपिंग सोल्यूशन्स या कंपनीसोबत भागिदारी केली आहे. या भागिदारीमुळे केवळ इलेक्ट्रिक कार्सची मागणीच वाढणार नाही तर इलेक्ट्रिक कार्सचा वापरही वाढेल. या भागिदारीनुसार कंपनी जयपूरमधील पेट्रोल पंपांवर बॅटरी स्वॅपिंग सेटअप तयार करणार आहे. तसेच येत्या काळात देशातील 50 शहरांमध्ये ही सुविधा प्रदान करण्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार आहे.

कशी असेल बॅटरी स्वॅपिंग प्रणाली?

साधारणपणे कोणत्याही इलेक्ट्रिक कार, बाईक अथवा थ्री व्हिलरची बॅटरी चार्ज करण्यासाठी सरासरी 3 ते 4 तास लागतात. अशा परिस्थिती बॅटरी स्वॅपिंग पद्धत तुमचा वेळ वाचवेल. याद्वारे कंपनी तुम्हाला चार्ज केलेली बॅटरी देईल आणि बदल्यात तुमच्या कारमधील बॅटरी काढून घेईल. संपूर्ण प्रोसेससाठी अवघी काही मिनिटं लागतील. तसेच ही सुविधा किफायतशीरही असेल.

इँडियन ऑईलकडून बॅटरी स्टेशन्स उभारण्यास सुरुवात

हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अगोदरच इंडियन ऑयल कॉर्पोरेशन कंपनीने सन मोबिलिटी या कंपनीशी हातमिळवणी करत बॅटरी स्वॅपिंग सुविधा पुरवण्यासाठी अनेक शहरांमध्ये स्टेशन्स उभारण्यास सुरुवातही केली आहे.

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार

दरम्यान, बंगळुरूची इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Pravaig Dynamics ने त्यांच्या आगामी इलेक्ट्रिक कार प्रॅवाइग एक्सटिन्शन एमके 1 (Pravaig Extinction Mk1) लॉन्च करण्याची तयारी सुरु केली आहे. नुकतीच कंपनीने या कारबाबतची काही माहिती सादर केली आहे. 2021 च्या सुरूवातीला ही कार लॉन्च होऊ शकते. विशेष म्हणजे ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमीपर्यंत धावेल असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे कारप्रेमींच्या मनात ही कार नक्की बसणार असं बोललं जात आहे.

30 मिनिट चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 300 किलोमीटरपर्यंत धावेल. Pravaig Dynamics ने म्हटलं आहे की, या कारचा कमाल वेग 196 किलोमीटर प्रति तास इतका आहे. ही कार अवघ्या 5.4 सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका स्पीड पकडते. सोबतच भारतातील आघाडीच्या कार कंपन्याही लवकरच इलेक्ट्रिक कार्स लाँच करणार आहेत. महिंद्रा आणि मारुती सुझुकी या दोन भारतीय कंपन्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

संबंधित बातम्या

देशात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली, टाटा मोटर्सच्या Nexon EV च्या 2,200 युनिट्सची विक्री

पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार

2021 मध्ये ‘या’ शानदार इलेक्ट्रिक कार लाँच होणार, कमी किंमतीत दमदार फिचर्स

(HPCL partners with VoltUp for battery swapping solutions across India)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.