भावकी बघतच राहिल, 7-सीटर, सनरूफ आणि जबरदस्त फीचर्स, मोठ्या कुटुंबासाठी परफेक्ट कार, किंमत फक्त….
जर तुम्हाला देखील कमी बजेटमध्ये मोठ्या कुटुंबासाठी मोठी कार आणि जबरदस्त फीचर्स असणारी कार घेयची असेल तर ही कार एकदम बेस्ट. जाणून घ्या किंमत.

किआ इंडियाने आपल्या लोकप्रिय MPV कॅरेंस क्लॅविसचा नवा HTE (EX) व्हेरिएंट भारतीय बाजारात अधिकृतपणे लॉन्च केला आहे. ज्या ग्राहकांना कमी किंमतीत जास्त फीचर्स असलेली 7-सीटर कार हवी आहे त्यांच्यासाठी ही कार बेस्ट आहे. Image Credit source: Social media
- गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत अनेक कंपन्या आपल्या दमदार आणि जबरदस्त फीचर्स असणाऱ्या कार लॉन्च करताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एका कंपनीने मोठ्या कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये कार लॉन्च केली आहे.
- किआ इंडियाने आपल्या लोकप्रिय MPV कॅरेंस क्लॅविसचा नवा HTE (EX) व्हेरिएंट भारतीय बाजारात अधिकृतपणे लॉन्च केला आहे. ज्या ग्राहकांना कमी किंमतीत जास्त फीचर्स असलेली 7-सीटर कार हवी आहे त्यांच्यासाठी ही कार बेस्ट आहे.
- या व्हेरिएंटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.54 लाख रुपये ठेवण्यात आली असून, तो कॅरेंस क्लॅविस रेंजमधील एक आकर्षक कार ठरत आहे. ही कारमध्ये ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्याय मिळणार आहेत.
- HTE (EX) व्हेरिएंटची सर्वात मोठी आणि लक्षवेधी खासियत म्हणजे 1.5L पेट्रोल इंजिनसह पहिल्यांदाच देण्यात आलेली इलेक्ट्रिक स्कायलाइट सनरूफ कार आहे. ही कार फुली ऑटोमॅटिक टेंपरेचर कंट्रोल, LED DRLs आणि पोजिशन लॅम्प्स, LED केबिन लॅम्प्स देण्यात आले आहेत.
- त्यामुळे जर तुम्ही सनरूफ, प्रीमियम फीचर्स आणि बजेट-फ्रेंडली किंमत असलेली 7-सीटर कार घेयची असेल तर नवा किआ कॅरेंस क्लॅविस HTE (EX) हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.





