
टाटा मोटर्सने काही महिन्यांपूर्वी प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोज अपडेट केले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे टाटा अल्ट्रोज ही कार भारतातील एकमेव हॅचबॅक कार आहे.

यामध्ये हे मॉडेल डिझेल, पेट्रोल आणि CNG मध्ये उपलब्ध आहे. ही कार तीन प्रकारांमध्ये येते. ज्यामध्ये 1.2 लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन, 1.2 लीटर आयसीएनजी इंजिन आणि 1.5 लीटर रेव्होटोर्क डिझेल इंजिन.

टाटा अल्ट्रोज डिझेल कारची किंमत 8.09 लाख रुपयांपासून आहे. यामध्ये स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

यामध्ये अल्ट्रोज प्युअर आणि क्रिएटिव्ह हे दोन्ही मॉडेल्स सनरुफमध्ये उपलब्ध आहेत. यासह क्रिएटिव्ह मॉडेल्समध्ये डिझेल एएमटी देखील आहे.

या कारच्या डिझाइनमध्ये काही मोठा बदल करण्यात आला नाही मात्र, यामध्ये पहिल्यांदाच फ्लश डोअर हँडल बसवण्यात आले आहेत.