पैसा वसूल ईव्ही कार! एका चार्जमध्ये 320 किमी दामटा… मिडल क्लाससाठी एकदम बेस्ट
इलेक्ट्रिक कारचा बाजार आता चांगलाच फुलला आहे. हायब्रीड कार बाजारात येऊ लागल्याने ग्राहकांची पसंती मिळत आहे. कार नवीन प्रयोगाला प्रतिसाद देत आहेत. या कंपनीने आता ईव्ही मार्केटमध्ये दमदार पाऊल ठेवले आहे. ही कार बजेट फ्रेंडली असल्याने ग्राहकांना एक चांगला पर्याय मिळाला आहे.

EV Car: इलेक्ट्रिक कारचा बाजार फुलला आहे. कंपन्या हायब्रीड कारसह अनेक प्रयोग करत आहेत. त्यात सिट्रोएन कंपनीने भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक कार Citroen eC3X लाँच केली आहे. कंपनीने हे मॉडेल Battery-as-a-Service (BaaS) या आधारावर मॉडेल आणले आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक कारची किंमत अगदी स्वस्त ठेवली आहे. या इलेक्ट्रिक कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.89 लाख रुपये इतकी आहे. या कारसाठी बुकिंग सुरू केली आहे. एका चार्जमध्ये ही कार 320 किमी दामटता येईल.
SUV सारखा स्टायलिश लूक
नवीन Citroen eC3X चे डिझाईन अगदी पेट्रोल मॉडेलसारखेच आहे. कारच्या समोरील बाजूला LED DRLs, फॉग लॅम्प आणि कंपनीचे सिग्नेचर ग्रिल आहे. त्यामुळे कारचा लूक डोळ्यात भरतो. याशिवाय 15 इंचाचे अलॉय व्हील्स आणि बॉडी क्लॅडिंगमुळे या SUV ला छान लूक येतो. कंपनी ही इलेक्ट्रिक कार सहा रंगात घेऊन आली आहे. यामध्ये पोलर व्हाईट, स्टील ग्रे, कॉस्मो ब्लू, पर्ला नेरा ब्लैक, गार्नेट रेड आणि डीप फॉरेस्ट ग्रीन यांचा समावेश आहे.
कारमध्ये अनेक फीचर्स
या कारच्या इंटिरिअरमध्ये मोठा बदल केलेला नाही. पण इलेक्ट्रिक मॉडेलला नवीन ओळख देण्यासाठी डॅशबोर्डवर इलेक्ट्रिक ब्लू फिनिशिंग देण्यात आली आहे. सीटवर प्रिमियम लेटरेट अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. कारमध्ये 10.25 इंचाचा एक मोठा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आला आहे. ही सिस्टिम वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करते.
Citroen eC3X मध्ये वायरलेस मोबाईल चार्जर
कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी 2.0
रिमोट एक्सेस फीचर्स आणि इलेक्ट्रोक्रोमिक IRVM
JBL ऑडियो सिस्टिम आणि फ्रंट-रिअर डॅशकॅम पॅकेज खरेदी करता येईल
सुरक्षेसाठी या कारमध्ये 6 एयरबॅग, ABSसह EBD, ISOFIX चाईल्ड सीट माऊंट
320KM ची रेंज आणि 57 मिनिटात चार्ज
नवीन Citroen eC3X मध्ये 29.2 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही इलेक्ट्रिक कार एकदा फुल चार्ज झाल्यावर 320 किलोमीटर धावते. यामधील 57 अश्वशक्तीची इलेक्ट्रिक मोटर, 143Nm चा टॉर्क मिळतो. DC फास्ट चार्जरच्या मदतीने ही बॅटरी 10 टक्के ते 80 टक्के चार्जिंगसाठी अवघे 57 मिनिटांचा वेळ घेते.