AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमी खर्चात दमदार प्रवास! ऑफिसमध्ये जाण्यासाठी लाखाच्या आत एकदम बेस्ट 125 सीसी बाईक

Best Office 125cc Bike: सध्या पेट्रोलचे दर वाढले आहेत. पुन्हा दर वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी कमी खर्चात दमदार बाईकचा पर्याय शोधत असाल तर या बाईक तुमच्यासाठीच आहेत. ऑफिसमध्ये जाण्यासाठी या एकदम बेस्ट 125 सीसी बाईक आहेत.

कमी खर्चात दमदार प्रवास! ऑफिसमध्ये जाण्यासाठी लाखाच्या आत एकदम बेस्ट 125 सीसी बाईक
Best Office 125cc BikeImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 12, 2026 | 10:02 PM
Share

Best Office 125cc Bike: सध्या इंधनाचे दर वाढले आहेत. पेट्रोलने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहेत. अशावेळी कमी खर्चात दमदार बाईकचा पर्याय शोधत असाल तर या बाईक तुमच्या उपयोगी ठरू शकता. ऑफिसमध्ये जाण्यासाठी या एकदम बेस्ट 125 सीसी बाईक आहेत. या बाईकची किंमत लाखाच्या आत आहे. म्हणजे सुरुवातीची किंमत एक लाख रुपयांच्या आत आहे. शो-रूमला गेल्यावर तुमच्या आवडीच्या मॉडलसाठी अधिक खर्च करावा लागू शकतो.

Hero Super Splendor: नोकरदार वर्गात आजही हिरो सुपर स्प्लेंडर ही आवडती बाईक आहे. या बाईकचे 124.7 cc इंजिन ही त्याची खासियत आहे. ही साधी आणि सिम्पल बाईक अनेकांसाठी एकदम खास आहे. कारण ती दूरच्या प्रवासासाठी एकदम खास आहे. कमी खर्चात आरामदायक सिंगल पीस सीटमुळे ही बाईक अनेकांसाठी चांगला पर्याय ठरतो. यामुळे पाठदुखी आणि खांद्यदुखी सारखा त्रास होत नाही.

मायलेज हा या बाईकचा प्लस पॉईंट आहे. हिरोचे i3S (आयडल स्टार्ट-स्टॉप) टेक्नोलॉजी ट्रॅफिकदरम्यान आपोआप इंजिन बंद करते. त्यामुळे इंधनाची बचत होते. या बाईकचा मेंटनेंस खर्च कमी आहे. तसेच स्पेअर पार्ट्सही स्वस्त मिळतात. या बाईकची एक्स शोरूम किंमत ₹81,068 पासून सुरू होते.

Honda Shine 125: या सेगमेंटमधील ही सर्वात जास्त विक्री होणारी आणि आवडती बाईक आहे. सायलेंट स्टार्ट आणि स्मूथ इंजिन ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत. सकाळी जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता तेव्हा तिचे इंजिन विना कोणत्याही आवाजाशिवाय व्हायब्रेशनने सुरू होते. एकदम गर्दीतही ही या बाईकचे गिअर शिफ्टिंग आणि क्लच स्मूथ काम करते. रायडरवर तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

या बाईकचा लूक अत्यंत प्रोफेशनल आणि क्लासी आहे. या बाईकचे 124 सीसीचे eSP इंजिन दमदारच नाही तर जवळपास ताशी 60 ते 65 किमी प्रति लिटरचे जोरदार मायलेजही देते. या बाईकची रिसेल व्हॅल्यूही जोरदार आहे. होंडा शाईन 125 ची एक्स शोरूम किंमत ₹81,502 रुपयापासून सुरु होते.

TVS Raider 125: जर तुम्हाला स्पोर्टी लूक अथवा लेटेस्ट फीचर्सची बाईक हवी असेल तर टीव्हीएस 125 हा एकदम अचूक पर्याय आहे. या बाईकचे मॉडर्न डिझाईन, रोबोटिक एलईडी हेडलाईट आणि मस्कुलर फ्यूल टँक पाहता क्षणीच तुम्हाला मोहून टाकते. कमी वेळेत ही चांगला वेग पकडते. त्यामुळे झटपट ऑफिस गाठता येते.

या बाईकमध्ये दोन रायडिंग मोड्स (इको आणि पॉवर) असतात. याशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल कंसोल आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखे फिचर्स कार्यालयापर्यंतचा वेळ जाणवू देत नाही. तर येताना कार्यालयातील टेन्शन छुमंतर करते. या बाईकची एक्स शोरूम किंमत ₹82,810 पासून सुरू होते.

Bajaj Pulsar 125: कमी बजेटमध्ये स्पोर्टी बाईकची मजा घ्यायची असेल तर हा एकदम जोरदार पर्याय आहे. या बाईकचे चेसिस आणि मस्कुलर बॉडी पल्सर 150 सारखीच आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाताना एकदम वेगळा फील येतो. या बाईकचा 124.4cc इंजिन या यादीत सर्वात दमदार पॉवर (11.8 PS) जनरेट करते. या बाईकची क्लिप-ऑन हँडलबार आणि स्प्लिट सीट व्हेरिएंट्स तिला स्पोर्टी लूक देते. मायलेज थोडा कमी असला तरी हा एक चांगला पर्याय ठरतो. या बाईकची एक्स शोरूम किंमत ₹92,111 पासून सुरू होते.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?