सिंगल चार्जवर 100KM रेंज, Ola S1, TVS iQube ला टक्कर देण्यासाठी नवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात

| Updated on: Oct 19, 2021 | 1:28 PM

भारतीय इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. या विभागात, ओला एस 1 आणि टीव्हीएस iQube सारख्या गाड्यांनी नुकतीच एंट्री घेतली आहे. आता या दोन स्कूटरशी स्पर्धा करण्यासाठी हैदराबाद स्थित Dao EV Tech कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर आणत आहे.

सिंगल चार्जवर 100KM रेंज, Ola S1, TVS iQube ला टक्कर देण्यासाठी नवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात
Dao 703 Electric Scooter
Follow us on

मुंबई : भारतीय इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. या विभागात, ओला एस 1 आणि टीव्हीएस iQube सारख्या गाड्यांनी नुकतीच एंट्री घेतली आहे. आता या दोन स्कूटरशी स्पर्धा करण्यासाठी हैदराबाद स्थित Dao EV Tech कंपनी आपली इलेक्ट्रिक स्कूटर आणत आहे. Dao 703 असे या स्कूटरचे नाव आहे. या स्कूटरची किंमत 1.2 लाख रुपये आहे, परंतु EV सबसिडीनंतर स्कूटरची किंमत 86,000 रुपये असेल. (Dao 703 electric scooter ready to launch in india)

Dao 703 ला 72 V BLDC मोटर मिळेल, ज्याची जास्तीत जास्त पॉवर 3500 W आहे. तसेच यामध्ये 72 V LFP Li-ion बॅटरी दिली जाईल. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर सिंगल चार्जवर 100 किमीची रेंज देऊ शकते. या स्कूटरची कमाल गती 70 किमी / तास इतकी असू शकते. त्याच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टर्न सिग्नल, एलईडी टेल लाइट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादींचा समावेश आहे.

भारतीय ग्राहकांसाठी Dao 703 चे बुकिंग सुरू झाले आहे, परंतु त्याच्या डिलिव्हरीला काही वेळ लागेल आणि ही डिलिव्हरी जानेवारीमध्ये सुरू होऊ शकते. कंपनी भारतात आपले नेटवर्क वाढवत आहे. Dao EV Tech पहिल्या टप्प्यात दक्षिण भारतातील 20 डीलर्ससह कामकाज सुरू करेल, तर दीड वर्षानंतर ईव्ही निर्मात्यांचा देशभरात 300 डीलर्स स्थापन करण्याचा मानस आहे.

Ola S1 ची खासियत

स्कूटरचं बेस मॉडेल ओला इलेक्ट्रिक एस 1 स्कूटरची किंमत 1 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. ई-स्कूटर सुमारे 120 किलोमीटरच्या रेंजसह येते. एस 1 प्रो, त्यांची टॉप-स्पेक ई-स्कूटर आहे, जी एका चार्जवर सुमारे 180 किलोमीटर रेंजसह येते असा दावा कंपनीने केला आहे.

एस 1 मॉडेलसाठी ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी आउटपुट 2.98 kWh असेल, तर थोडी महाग असलेल्या एस 1 प्रो मॉडेलमध्ये 3.97 kWh बॅटरी देण्यात आली आहे. S1 Pro ची टॉप स्पीड 115 kmph इतकी आहे, ज्यामध्ये हायपर समाविष्ट आहे.

S1 आणि S1 Pro दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर फुल LED लायटिंग पॅकेज आणि नेव्हिगेशनसह 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात. हा डिस्प्ले 3GB रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये वायफाय, ब्लूटूथ आणि 4G कनेक्टिव्हिटी सपोर्ट देण्यात आला आहे.

कशी आहे TVS iQube?

TVS iQube ची ऑन-रोड किंमत 1.10 लाख रुपये इतकी आहे. टीव्हीएसचा दावा आहे की, ही स्कूटर सिंगल चार्जवर 75 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. तर, ही स्कूटर शून्य ते 40 किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडण्यासाठी 4.2 सेकंद घेते. स्कूटरचा टॉप स्पीड 78 किलोमीटर प्रति तास इतका आहे. TVS iQube मध्ये 4.4 इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम-आयन बॅटरी दिली असून पूर्ण चार्ज होण्यासाठी ही 5 तासांचा वेळ घेते. कंपनी TVS iQube सोबत 3 वर्ष किंवा 50 हजार किलोमीटरपर्यंतची वॉरंटी देते.

इतर बातम्या

शानदार ऑफर! अवघ्या 27 हजारात घरी न्या होंडाची ढासू बाईक, सोबत 12 महिन्यांची वॉरंटी

हिरो मोटोकॉर्पची Xtreme 160R Stealth Edition बाजारात, जाणून घ्या नव्या बाईकमध्ये काय आहे खास?

70,000 रुपयांहून कमी किंमतीत शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Dao 703 electric scooter ready to launch in india)