Ferrari ची EV कार 382 कोटींना विक्री!कोणी केली ही महागडी चारचाकी खरेदी?

Chassis O Ferrari Luce: वेगवान, दमदार आणि आलिशान कारसाठी प्रसिद्ध फेरारी या कंपनीने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात आणली. या पहिल्या कारच्या किंमतीने अनेकांचे डोळे विस्फरले. ही कार 382 कोटींना विक्री करण्यात आली. जगातील ही सर्वात महागडी इलेक्ट्रिक कार ठरली. कोणी केली या कारची खरेदी?

Ferrari ची EV कार 382 कोटींना विक्री!कोणी केली ही महागडी चारचाकी खरेदी?
फेरारी ल्युस चेसिस ओ
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 18, 2026 | 9:28 PM

आलिशान कार निर्माता Ferrari ने त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार फेरारी ल्युस चेसिस ओ (Chassis O Ferrari Luc) ची विश्वविक्रमी किंमतीला विक्री केली. ही कार 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय चलनात 382 कोटी रुपयांना विकल्या गेली. ही जगातील इलेक्ट्रिक कारसाठी मोजलेली सर्वाधिक किंमत मानली जात आहे. ऑटोमोबाईलमध्ये या कंपनीने पहिल्या इलेक्ट्रिक कारची लिलाव प्रक्रिया पूर्ण केली. या इलेक्ट्रिक कारने सर्व रेकॉर्ड इतिहास जमा केली. सॉथबीज या जगप्रसिद्ध लिलाव संस्थेने ही प्रक्रिया पूर्ण केली. कारच्या मूळ मूल्यापेक्षा 35 पट पेक्षा जास्त बोली लावल्या गेली. गेल्या वेळी या संस्थेने 26 दशलक्ष डॉलरचा निधी उभारला होता.

ल्युस मालिकेतील पहिली ईव्ही

फेरारी ल्युस चेसिस ओ ही पूर्णपणे बॅटरीवर चालते. या कारचे डिझाईन ॲपल कंपनीचे माजी चीफ डिझाईन ऑफिसर आणि आयफोनचे निर्माते सर जॉनी आयव्ह यांच्या लव्हफ्रॉम या स्टुडिओच्या सहकार्याने साकारण्यात आले आहे. झेप घेणारा घोडा हा आयकॉनिक लोगो या पांढऱ्या शुभ्र कारवर खुलला आहे. या कारसाठी मद्रेपर्ला या नावाचा विशेष सेमी ग्लास रंग वापरण्यात आला आहे. रंगसंगतीच्या प्रभावामुळे प्रकाशाच्या तीव्रतेनुसार विविध कोनातून कारचा रंग हिरवाऐवजी जांभळा असा बदलत जातो. हा पाहताना मन हरखूनन जातं. या कारला चार दरवाजे, पाच आसन व्यवस्था असेल. इटलीतील मारनेलो येथे ही कार असेंबल केली जाणार आहे. 2027 च्या सुरुवातीला ही कार ग्राहकांच्या हवाली करण्यात येईल.

इंजिन आणि परफॉर्मेंस

Luce Ferrari मध्ये क्वाड मोटर ऑल व्हील ड्राईव्ह सिस्टिम आहे. ही कार 1,050hp च्या ताकदीसह 990nm चा टॉर्क जनरेट करेल. याशिवाय ही कार 310kmph अशी वाऱ्याच्या वेगानं दामटता येईल. ड्रायव्हिंग रेंज 530 किमी इतकी आहे. म्हणजे एकदा चार्ज केल्यावर ती 500 किमीपेक्षा जास्त रपेट मारेल. Ferrari च्या दाव्यानुसार 2026 यावर्षासाठी Luce कार उत्पादनापूर्वीच बुक होईल. या कारचे एक निश्चित उत्पादन करण्यात येणार आहे. पहिली कार टेलर मेड प्रोगामअतंर्गत खास फीचरसह तयार करण्यात आली आहे. ही कार खास करून Madeperla Semi-Gloss रंगात न्हाऊन निघाली आहे.

कोणी मोजली इतकी किंमत?

हर्बर्ट वर्थाईम यांनी लिलावात ही कार खरेदी केली. तिच्या मूळ किंमतीपेक्षा त्यांनी 35 अधिक किंमत मोजली. लिलाव संस्थेने त्यांचे नाव अधिकृतपणे उघड केलेले नाही. कायदेशीर नोंदीतून वर्थाईम यांचे नाव समोर आले. ते उद्योगपती, संशोधक आणि अब्जाधीश आहेत. 87 वर्षीय हर्बर्ट यांनी यापूर्वीही डेटोना SP3 ही फेरारी कार 26 दशलक्ष डॉलर्सला खरेदी केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us