AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : रवींद्र जडेजाने एकदा नाही तर चौथ्यांदा केली तीच चूक, टीम इंडियाला बसला फटका!

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉलमध्ये सुरू आहे. हा सामना निर्णायक स्थितीत असून शेवटच्या दिवसाकडे लक्ष लागून आहे. पण चौथ्या दिवशी रवींद्र जडेजामुळे भारतीय संघाला एक फटका बसला. कसा काय ते समजून घ्या.

IND vs SL : रवींद्र जडेजाने एकदा नाही तर चौथ्यांदा केली तीच चूक, टीम इंडियाला बसला फटका!
IND vs SL : रवींद्र जडेजाने एकदा नाही तर चौथ्यांदा केली तीच चूक, टीम इंडियाला बसला फटका! Image Credit source: PTI
| Updated on: Aug 18, 2026 | 9:13 PM
Share

गॉलमध्ये सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने 4 विकेट गमावले असून 288 धावांची गरज आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी 6 विकेट काढल्या की भारतीय संघाचा विजय पक्का होणार आहे. पण हा सहा विकेट्सचा आकडा आणखी कमी असू शकला असता. कदाचित शेवटच्या दिवशी पाच विकेट काढाव्या लागल्या असत्या. पण रवींद्र जडेजाची एक चूक टीम इंडियाला भोवली. श्रीलंकन कर्णधार धनंजय डिसिल्वाला फिरकीच्या जाळ्यात जडेजाने गुंतवलं होतं. सहज जाळ्यात फसल्याने विकेटही मिळाली, पण आनंद काही साजरा करता आला नाही. श्रीलंका फलंदाजी करत असताना 16व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा प्रकार घडला. डिसिल्वा पहिल्या स्लिपला झेल देऊन बसला. खेळपट्टी सोडणार तितक्यात पंचांनी नो बॉल दिला.

16 व्या षटकात रवींद्र जडेजाने काय केलं?

कसोटी क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजाचा सरळ राहणारा चेंडू फलंदाजांसाठी त्रासदायक ठरतो. त्यामुळे बहुतांश वेळा पायचीत किंवा त्रिफळाचीत होण्याची शक्यता असते. पण यावेळी रवींद्र जडेजाने गोलंदाजी वेगळेपणा दाखवच चेंडू वळवला. त्यामुळे फलंदाजाला काही कळण्याचा आता बॅटची किनार घेऊन गेला. तसेच स्लिपला उभ्या असलेल्या केएल राहुलच्या हातात गेला. त्यामुळे धनंजय डिसिल्वा सहज जाळ्यात अडकल्याचा आनंद होता. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. पंचांनी नो बॉल देताच भारतीय क्रिकेटपटू, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि क्रीडाप्रेमी यांना डोक्यावर हात मारावा लागला.

रवींद्र जडेजासोबत चौथ्यांदा असं घडलं

रवींद्र जडेजा पाय पॉपिंग क्रीजच्या भराच पुढे होता. त्यामुळे निराशा पदरी पडली. गॉल कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने चौथ्यांदा नो बॉल टाकला. फिरकीपटूने कसोटी सामन्यात वारंवार नो बॉल टाकणं हा चिंतेचा विषय आहे. त्याच्या चुकीमुळेच धनंजय डिसिल्वाला जीवदान मिळालं. त्याचा त्याने पुरेपूर फायदा गेला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा धनंजय डिसिल्वा नाबाद 31 धावांवर तंबूत परतला. आता पाचव्या दिवशी त्याला बाद करण्याचं आव्हान असेल.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर