पहिल्यांदा कार खरेदी केली असेल तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा, नाहीतर एक्साइटमेंटमध्ये होतील चुका

New Car Tips : जर तुम्ही नवीन कार घेतली असेल, तर तुमची कार नेहमीसारखी नवीन ठेवायची असेल तर या टिप्स फॉलो करा.

पहिल्यांदा कार खरेदी केली असेल तर या गोष्टी जरूर लक्षात ठेवा, नाहीतर एक्साइटमेंटमध्ये होतील चुका
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 01, 2023 | 8:35 AM

नवी दिल्ली : जर तुम्ही नवीन कार (car) घेतली असेल, तर तिच्या देखभालीची विशेष काळजी (maintenance) घेणे गरजेचे आहे. नवी कार घेतल्यावर अनेक वेळा ग्राहक उत्साहात कारची नीट काळजी घेणे विसरतात आणि बिनदिक्कतपणे कार वापरण्यास सुरुवात करतात. पण कारची व्यवस्थित काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. मुख्य म्हणजे दुचाकीपेक्षा कारची देखभाल करणे अधिक कठीण आहे. अशा परिस्थितीत, हवामानातील बदला अंतर्गत कोणत्याही वाहनाची देखभाल (car care) करणे आवश्यक आहे.

कार मॅन्युअलवर लिहीलेल्या गोष्टींकडे द्या लक्ष

बहुतेक लोक नेहमी एक चूक करतात की कारसोबत आलेले मॅन्युअल न वाचता ते घराच्या कोणत्यातरी कोपऱ्यात फेकून देतात. पण कारसोबत मिळालेले मॅन्युअल सर्वात महत्वाचे असून त्या भविष्यात तुम्हाला उपयोगी पडू शकतात. त्यामध्ये कारची सर्व्हिसिंग आणि कारमध्ये किती टायर प्रेशर ठेवावे यासारख्या महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे. त्यामुळे कार घेतल्यावर हे मॅन्युअल नीट वाचून त्याप्रमाणे कारची काळजी घ्यावी. तर कार जास्त काळ चांगली राहील.

कारमध्ये कोणतीही ॲक्सेसरी लावण्यापूर्वी घ्या काळजी

प्रत्येक कार विकत घेतल्यावर तुम्हाला त्यासोबत काही ॲक्सेसरीज मिळतात. परंतु तुम्ही बाहेरून खरेदी करत असाल आणि कोणतीही ॲक्सेसरी बसवून घेत असाल तर तुमच्या माहितीसाठी हे जाणून घ्या की आपल्या देशात कोणत्याही प्रकारच्या ॲक्सेसरीज बसवण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत फक्त काही निवडक प्रकरणांमध्ये कारमध्ये ॲक्सेसरी लावण्याची परवानगी दिली जाते.

कार पेंटची घ्या काळजी

जेव्हा तुम्ही नवीन कार खरेदी करता तेव्हा त्यावर स्क्रॅच असला तरी ते खूप हायलाइट होते. अशा परिस्थितीत, हे नुकसान टाळण्यासाठी, तुम्ही कारवर सिरॅमिक कोटिंग लावू शकता. यामुळे तुमच्या कारचे धुळीपासून आणि स्क्रॅचेसपासून संरक्षण होईल.

वेळोवेळी सर्व्हिंसिग करून घ्या

तुमची नवीन कार नेहमी नवीन दिसावी आणि जास्त काळ टिकावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तिची वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, अधिक रॅश ड्रायव्हिंग करणे टाळावे. जर तुम्ही जास्त रॅश ड्रायव्हिंग करत असाल तर त्याचा कारच्या कामगिरीवर परिणाम होतो.