कारमध्ये इंधन भरताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर बसेल मोठा फटका

तुमच्या वाहनात इंधन भरताना मूलभूत नियमांचे पालन केल्यास, तुम्ही पंपावरील धोका टाळू शकता आणि इतरांनाही सुरक्षित ठेवू शकता.

कारमध्ये इंधन भरताना या चुका टाळा, नाहीतर बसेल मोठा फटका
Image Credit source: freepik
| Updated on: Mar 30, 2023 | 10:09 AM

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या फॉसिल फ्युएलला (Fossile fuel) अधिक लवकर आग लागते. या इंधनाचा पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात साठा केला जातो. अशा परिस्थितीत, अशा ठिकाणी सुरक्षा प्रोटोकॉलचे (safety protocols) पालन करणे अधिक महत्त्वाचे बनते. तुमच्या गाडीत इंधन भरण्यासाठी जाताना पेट्रोल पंपावर सतर्क राहणे, ही तुमची पहिली जबाबदारी आहे. तसेच कोणत्याही इंधन स्टेशनवर अथवा पंपावर तुमच्या गाडीत इंधन भरताना तुम्ही काही मूलभूत नियमांचे (follow rules) पालन केले पाहिजे.

जर तुम्ही या नियमांचे पालन केले तर इंधन स्टेशनवरील धोका टळतो आणि इतर लोकंही सुरक्षित राहतात. गाडीत इंधन भरताना या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी.

गाडीत फ्युएल भरताना रहा सतर्क, घ्या या गोष्टींची विशेष काळजी

इंधन भरताना गाडी बंद ठेवावी

जेव्हा तुम्ही तुमच्या गाडीत इंधन भरण्यासाठी पंपावर जाल तेव्हा गाडीचे इंजिन पूर्णपणे बंद ठेवावे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी कारमध्ये इंधन भरताना इंजिन बंद ठेवणे हे नेहमीच सुरक्षित असते.

आगीपासून लांब रहावे

पेट्रोल पंपावर अशा कोणत्याही गोष्टीचा वापर करू नका, ज्यामुळे आग लागू शकते किंवा ठिणगी पडू शकते. अशा ठिकाणी कधीही लायटर पेटवू नका अथवा मॅचस्टिकचा वापर करू नका. तसेच तुमच्या मुलांना Magnifying glass किंवा भिंगाचा वापर करू देऊ नका.

मोबाईल फोन स्विच ऑफ करा

मोबाईल फोनमधून रेडिएशन निघतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. तुमचा डिव्‍हाइस उन्हाळ्यात दिवशी अती तापू शकतो आणि स्फोट होऊन धोका निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे इतरांचा जीवही धोक्यात सापडू शकतो. पंपावर आगही लागू शकते. म्हणूनच इंधन स्टेशनवर मोबाईल फोनवर बोलणे अधिक धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत, इंधन भरायला जाताना, स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तुमचा फोन नेहमी बंद करावा, हे आठवणीने लक्षात ठेवावे .