Hero Mavrick 440 | रस्त्यावर धावणार हिरोचा हंक! किंमत आहे तरी किती?

| Updated on: Feb 15, 2024 | 11:47 AM

Hero Mavrick 440 | हिरो कंपनीने ही दमदार बाईक जयपूर येथील एका कार्यक्रमात सादर केली. कंपनीने ही बाईक अधिकृतरित्या लाँच केली आहे. Mavrick 440 ही बाईक Harley 440 वर आधारीत आहे. या बाईकला हिरो मोटोकॉर्प आणि अमेरिकन बाईक उत्पादक हार्ले डेव्हिडसनने तयार केले आहे.

Hero Mavrick 440 | रस्त्यावर धावणार हिरोचा हंक! किंमत आहे तरी किती?
Follow us on

नवी दिल्ली | 15 February 2024 : देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) नुकतीच जयपूरमध्ये तिची दमदार Hero Mavrick 440 ही बाईक सादर केली. आज कंपनीने अधिकृतपणे हे मॉडेल विक्रीसाठी सादर केले. मोटारसायकल हिरो मोटोकॉर्प आणि हार्ले-डेव्हिडसन यांनी संयुक्तपणे Hero Mavrick 440 तयार केली. ही बाईक Harley 440 वर आधारीत आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन या आधारावर या बाईकची सुरुवातीची किंमत 1.99 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या बाईकचे टॉप मॉडेलसाठी ग्राहकांना 2.24 लाख रुपये मोजावे लागतील.

Harley 440 पेक्षा एकदम स्वस्त बाईक

हिरो मोटोकॉर्प हे हार्ले डेव्हिडसनच्या Harley 440 वर आधारीत आहे. पण त्यापेक्षा 41 हजार रुपयांनी स्वस्त आहे. Harley Davidson X440 ची सुरुवातीची किंमत 2.40 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 2.80 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. ही बाईक महागड्या श्रेणीत मोडते. त्यासाठी अधिक दाम मोजावे लागतात.

हे सुद्धा वाचा

बुकिंग आणि डिलिव्हरी

ही दमदार बाईक बाजारात उतरवताच कंपनीने तिची अधिकृत बुकिंग सुरु केली आहे. ही बाईक ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि अधिकृत डीलरपशीपच्या माध्यमातून बुक करता येईल. कंपनी Hero Mavrick 440 ची डिलिव्हरी पुढील एप्रिल महिन्यापासून सुरु करणार आहे. या बाईकला जोरदार प्रतिसाद मिळेल, असा कंपनीचा विश्वास आहे.

इंजिन आणि कामगिरी

Mavrick 440 मध्ये इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शनसह एअर कुल्ड ऑईल कुल्ड 2V सिंगल सिलेंडर 440 सीसी क्षमतेचे TorqX इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6000 आरपीएमवर 27 बीएचपी आणि 4000 आरपीएम वर 36 एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनल 6 स्पीड ट्रान्समिशन, स्लिप अँड असिस्ट क्लच, स्टील रेडियल पॅटर्न टायरने जोडण्यात आले आहे.

या रंगात मिळेल बाईक

हिरो मॅवरिक 440 ही बाईक तीन व्हेरिएंटसह एकूण पाच आकर्षक रंगात उपलब्ध आहे. या बाईकचे बेसिक मॉडेल आर्कटिव्ह व्हाईटमध्ये, दुसरे मॉडेल सेलेस्टिअल ब्लू, फिअरलेस रेडमध्ये, तर टॉप व्हेरिएंट हे फँटम ब्लॅक आणि एगिग्मा ब्लॅक या रंगात उपलब्ध आहे. बुकिंग सुरु झाली आहे. या बाईकची डिलिव्हरी एप्रिल महिन्यात मिळेल.