Hero Motocorp आज आणत आहे त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर, काय आहे फीचर्स आणि रेंज?

इलेकट्रीक स्कूटरच्या बाजारात हिरो नवी स्कूटर बाजारात आणणार आहे. याचे फीचर्स आणि किंमत काय असू शकते हे जाणून घेऊया.

Hero Motocorp आज आणत आहे त्यांची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर, काय आहे फीचर्स आणि रेंज?
हिरो इलेक्ट्रिक Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 11:14 AM

मुंबई, भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कुटर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. आता या स्पर्धेमध्ये     हिरो मोटोकॉर्पने (Hero Motocorp)  देखील उडी घेतली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरसाठी हिरोने  Vida नावाचा सब-ब्रँड विकसित केला आहे. हा  ब्रँड भारतीय  बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. या स्कूटरला नवीन नाव असेल आणि नवीन प्रकारचा लोगो देखील वापरला जाईल. हे इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरीचे नवीन तंत्रज्ञान सादर करू शकते. अद्याप कंपनीने या स्कूटरबद्दल जास्त माहिती दिलेली नाही, परंतु आतापर्यंत लीक रिपोर्ट्समध्ये बरेच काही समोर आले आहे. लॉन्च करण्यापूर्वी, त्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

वापरणार बॅटरी स्वॅप तंत्रज्ञान

विडा इलेक्ट्रिक स्कूटरसाठी स्वॅप करण्यायोग्य बॅटरी तंत्रज्ञानासाठी, कंपनीने गोगोरो या तैवान-आधारित कंपनीशी भागीदारी केली आहे जी स्वॅप करण्यायोग्य बॅटरी बनविण्यात अग्रेसर आहे. याशिवाय Hero MotoCorp ने Ather Energy सोबत देखील भागीदारी केली आहे, जे चांगले चार्जिंग नेटवर्क प्रदान करण्यात मदत करेल.

 चार्जिंगचे वेगळे तंत्रज्ञान उपलब्ध

भारतीय इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये आज लॉन्च करण्यात आलेला विडा घरामध्ये आणि घराबाहेर चार्ज केला जाऊ शकतो. या इलेक्ट्रिक स्कूटरची कंपनीने आतापर्यंत अनेकदा वेवेगळ्या स्थळावर तपासणी  केली आहे. कंपनीने आधीच सांगितले आहे की त्याचे 1006 प्रोटोटाइप तयार केले गेले आहेत आणि त्यांची चाचणीदेखील केली गेली आहे.

हे सुद्धा वाचा

विडा इलेक्ट्रिक स्कूटरचे स्पर्धक

Vida इलेक्ट्रिक स्कूटर आज भारतात लॉन्च होणार आहे. ही स्कूटर बजाज चेतक, TVS iQube आणि Ather 450X शी स्पर्धा करेल.  या स्कूटरची किंमत एक लाख रुपयांपर्यंत आहे.

विडाची टॉप स्पीड आणि ड्रायव्हिंग रेंज

विडा इलेक्ट्रिक स्कूटरच्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल सांगायचे तर, ती 100 किमी पर्यंत प्रवास करू शकते. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 50 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकतो.

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.