Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती

पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक टू व्हीलरची (Electric Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. वाहन कंपन्या दररोज नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात आणत आहेत.

Top 5 Electric Scooters: ओला आणि हिरोसह 'या' 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सना भारतीय ग्राहकांची पसंती
Electric ScooterImage Credit source: Hero Electric
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:12 PM

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक टू व्हीलरची (Electric Vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. वाहन कंपन्या दररोज नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स बाजारात आणत आहेत. अशा परिस्थितीत मार्च महिन्यात भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर (E2W) च्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. एका महिन्यात पहिल्यांदाच तब्बल 40,000 युनिट्सची विक्री झाली आहे. या यादीत हिरो इलेक्ट्रिक (Hero Electric) कंपनी अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ओला इलेक्ट्रिक (Ola Electric), ओकिनावा ऑटोटेक, अँपियर सारख्या ब्रँडचाही या यादीत समावेश आहे. चला तर मग मार्च 2022 मध्ये विक्री होणाऱ्या टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

  1. हिरो इलेक्ट्रिक : हिरो इलेक्ट्रिक कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीच्या शर्यतीत सर्वात पुढे राहण्यात यशस्वी झाली आहे. कंपनीने केवळ या यादीत पहिलं स्थान मिळवलेलं नाही तर एका महिन्यात तब्बल 13,000 रुपयांपेक्षा जास्त युनिट्स विकणारा हा एकमेव इलेक्ट्रिक ब्रँड बनला आहे. FY22 मध्ये देखील हा ब्रँड या यादीत अव्वल स्थानावर होता. FY22 मध्ये ब्रँडने 65,303 युनिट्स इलेक्ट्रिक टू व्हीलर्सची विक्री केली होती.
  2. ओला इलेक्ट्रिक : ओला इलेक्ट्रिक हा देशातील सर्वाधिक विकल्या जाणार्‍या इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँडपैकी एक आहे. ईव्ही निर्मात्या कंपनीने मार्च महिन्यातच आपल्या ओला एस 1 प्रो स्कूटरच्या 9,121 युनिट्सची विक्री केली. एप्रिल महिन्यात कंपनीला या यादित पहिलं स्थान मिळवायचं आहे.
  3. ओकिनावा ऑटोटेक: ओकिनावा कंपनी दुसऱ्या स्थानावरुन खाली घसरली आहे. या ईव्ही निर्मात्या कंपनीने मार्च महिन्यात 8,284 वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी मार्चमध्ये नोंदवलेल्या विक्रीच्या तुलनेत ही मोठी उडी आहे. कारण गेल्या वर्षी मार्चमध्ये या कंपनीने 1,530 युनिट्सची विक्री केली होती. Okinawa Autotech ने अलीकडेच त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ockhi 90 लाँच केली आहे आहे. त्यामुळे कंपनीला एप्रिलमध्ये विक्रीच्या आकडेवारीत वाढ अपेक्षित आहे.
  4. अँपिअर व्हेईकल : झपाट्याने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये अँपिअरने चौथे स्थान मिळवले आहे. या ई-स्कूटर कंपनीने मार्च 2022 मध्ये 6,338 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये विकल्या गेलेल्या 941 युनिट्सपेक्षा ही विक्री खूप जास्त आहे.
  5. ॲथर एनर्जी : ॲथरने इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीमध्ये पाचवे स्थान कायम ठेवले आहे. मार्च 2022 मध्ये कंपनीने 2,222 युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 1,064 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या होत्या.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.